ETV Bharat / state

...तर पुढचे आंदोलन मुख्यमंत्र्याच्या घरासमोर करू - प्रहार जनशक्ती पक्ष - prahar janshakti

महापरीक्षा पोर्टलकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालू असून अनेक विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार करून यात नोकरी लागत आहे. मात्र, अभ्यास करून परीक्षा देणाऱया विद्यार्थांना डावलण्यात येत आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मोर्चा
author img

By

Published : Jul 30, 2019, 10:32 AM IST

यवतमाळ - महापरीक्षा पोर्टलकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालू असून अनेक विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार करून यात नोकरी लागत आहे. मात्र, अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना डावलण्यात येत आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख बिपीन चौधरी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. याची दखल शासनाने घेतली नाही तर पुढचे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उभारण्याचा इशाराही या मोर्चाच्या माध्यमातून युवकांनी दिले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मोर्चा

सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून नोकरीसाठी परीक्षेला समोर जात आहेत. मात्र, महापरीक्षा पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून काही मोजक्याच विद्यार्थ्यांना नोकरी मिळत आहे. त्यामुळे या महापरीक्षा पोर्टलची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शिवाजी ग्राउंड येथून शहरातील विविध भागातून जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी केली.

सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांवर शासनाने महापरीक्षा पोर्टल लादलेले आहे. या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना डावलून इतरांचीच निवड करण्यात आली आहे. अशा संशयास्पद बाबी या पोर्टलच्या भरतीमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत महापरीक्षा पोर्टलद्वारे झालेल्या सर्व परीक्षांची तपासणी एसआयटीमार्फत व्हावी, अशी मागणी या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगार युवक मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक मोर्चा काढतील, असा इशाराही बिपिन चौधरी यांनी दिला.

Intro:तर... पुढचे आंदोलन मुख्यमंत्र्याच्या घरासमोर करू -बिपीन चौधरी;  महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात प्रहारचा मोर्चाBody:यवतमाळ : महापरीक्षा पोर्टल कडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालू असून अनेक विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार करून यात नोकरी लागत आहे. मात्र, खरोखरच अभ्यास करून परीक्षा देत आहेत यात त्यांना डावलण्यात येत आहे. त्यामुळे हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने यवतमाळ विधानसभा प्रमुख बिपीन चौधरी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. याची दखल शासनाने घेतली नाही तर पुढचे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उभारण्याचा इशाराही या मोर्चाच्या माध्यमातून युवकांनी दिले आहे.
सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करून नोकरीसाठी परीक्षेला समोर जात आहे. मात्र महापरीक्षा पोर्टल मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून काही मोजक्याच विद्यार्थ्यांना नोकरीवर लावत आहे. त्यामुळे या महापरिक्षा पोर्टलची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा शिवाजी ग्राउंड येथून काढून शहरातील विविध भागातून जाऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी करत हे महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी केली.
सुशिक्षित बेरोजगार युवकांवर, विद्यार्थ्यांवर शासनाने महापरीक्षा पोर्टल लादलेले आहे. या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहिलेला नसून विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना डावलून इतरांचीच निवड करण्यात आली आहे. अशा सर्व बाबी संशयास्पद या पोर्टलच्या भरती मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आतापर्यंत महापरीक्षा पोर्टल द्वारे झालेल्या सर्व परीक्षांची तपासणी एसआयटीमार्फत व्हावी अशी मागणी या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगार युवक मुख्यमंत्र्यांच्या घरावर धडक मोर्चा्चा काढण्याचा इशाराही प्रहार जनशक्ती्ती पक्षाचे यवतमाळ विधानसभा प्रमुख बिपिन चौधरी यांनी दिला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.