ETV Bharat / state

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; मतदारांची पसंती आघाडी, की भाजपला?

आज यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक पार पडत आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी हे उमेदवार आहेत, तर भाजपकडून सुमित बाजोरिया उमेदवार आहे. आता या दोघांपैकी मतदार कोणाला पसंती देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

yavatmal legislative council byeletion
यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
author img

By

Published : Jan 31, 2020, 11:01 AM IST

यवतमाळ - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोट निवडणुकांच्या मतदानाला सुरवात झाली आहे. यवतमाळच्या बचत भवन या केंद्रावर मतदान होत आहे. जिल्ह्यात वणी, राळेगाव, केळापूर, यवतमाळ, दारव्हा ,पुसद आणि उमरखेड येथील तहसील कार्यालयात मतदान सुरू आहे.

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

यवतमाळ जिल्ह्यामध्ये 489 मतदार असून यामध्ये 244 महिला मतदार आहे. महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी हे उमेदवार आहेत, तर भाजपकडून सुमित बाजोरिया उमेदवार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील एकूण संख्याबळामध्ये भाजप 180, शिवसेना 101, राष्ट्रवादी 55, काँग्रेस 80, अपक्ष 55, बसप 2, एमआयएम 8, सप 2, असे पक्षीय बलाबल आहे. त्यात पंचायत समिती सभापती जिल्ह्यात भाजप 5, शिवसेना 6, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 3, असे एकूण 489 मतदार आहेत.

yavatmal legislative council byeletion
दुष्यंत चतुर्वेदी, महाविकास आघाडी उमेदवार
yavatmal legislative council byeletion
सुमित बाजोरिया, भाजप उमेदवार

महाविकास आघाडीचे एकूण 247 मतदार आहे, तर भाजपकडे 185 मतदार आहेत. या निवडणुकीत घोडेबाजार झाल्यास आघाडीची मते फुटण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्ट्या तगडे असल्याने निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

या निवडणुकीमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी ८ वाजतापासून मतदान सुरुवात झाली असून मतदारांच्या पसंतीस कोणता उमेदवार उतरतो? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Intro:nullBody:यवतमाळ: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था पोट निवडणुकांमध्ये मतदानाला सुरवात झाली आहे. यवतमाळच्या बचत भवन या केंद्रावर मतदान होत आहे. जिल्ह्यात वणी, राळेगावं, केळापूर, यवतमाळ, दारव्हा ,पुसद आणि उमरखेड येथील तहसिल कार्यालयात मतदान केंद्र आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 489 मतदार असून यात 244 महिला मतदार आहे. विकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी हे उमेदवार आहे. तर भाजप कडून सुमित बाजोरिया उमेदवार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मधील एकूण संख्याबळ मध्ये भाजप 180, शिवसेना 101, राष्ट्रवादी 55, कॉग्रेस 80, अपक्ष 55, बसपा 2, एमआयएम 8, सपा 2, असे पक्षीय बलाबल जिल्यात आहे. त्यात पंचायत समिती सभापती जिल्ह्यात भाजप 5 शिवसेना 6 राष्ट्रवादी 2 कॉग्रेस 3 असे एकूण 489 मतदार आहेत.

महाविकास आघाडीचे मतदार एकूण 247 मतदान आहे. तर भाजप कडे 185 मतदार आहेत.
या निवडणुकीत घोडेबाजार जर झालं तर आघाडी फुटू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही उमेदवार आर्थिक दृष्ट्या तगडे असल्याने निवडणूक अटीतटी होणार असल्याचे दिसून येत आहे.

या निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी आठ वाजता पासून मतदान सुरुवात झाली असून मतदार आपल्या पसंतीचा क्रम कुणाला येतात हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.