ETV Bharat / state

Former Mayor: न्यायालयाचा दणका, वणी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षांसह २४ नगरसेवकांवर गुन्हा दाखल - Former Mayor

Former Mayor: वणीच्या तत्कालीन सिओ माजी नगराध्यक्षांसह 24 सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेने घेतलेल्या ठरावाच्या विरोधात प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणात ( Court Registered Case) न्यायालयाने गुन्हा नोंद करत चौकशीचे आदेश दिले आहे. यावरून वणी पोलिसांनी गुरुवारी तत्कालीन मुख्याधिकारी, माजी नगराध्यक्ष व इतर 24 नगरसेवकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Wani Police Station
Wani Police Station
author img

By

Published : Dec 16, 2022, 2:10 PM IST

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपालिकेने ( Wani Municipality) घेतलेल्या ठरावाविरोधात प्रकरण न्यायप्रविष्ट होते. आयोजित सभा रद्द करून 3 मार्च रोजी नगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. या प्रकरणात न्यायालयाने गुन्हा नोंद करत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. यावरून वणी पोलिसांनी (Vani Police Station) गुरुवारी तत्कालीन मुख्याधिकारी, माजी नगराध्यक्ष व इतर 24 नगरसेवकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेले अधिकारी व पदाधिकारी: वणीच्या तत्कालीन सिओ माजी नगराध्यक्षांसह 24 सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेने घेतलेल्या ठरावाच्या विरोधात प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणात न्यायालयाने गुन्हा नोंद करत चौकशीचे आदेश दिले आहे. तत्कालीन मुख्याधिकारी संदीप बोरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, माजी नगरसेवक नितीन चहाणकर, वर्षा खुसपुरे, संतोष डंभारे, मंजुषा झाडे, धनराज भोंगळे, प्रीती बिडकर, राकेश बुग्गेवार, संगीता भंडारी, मनीषा लोणारे, प्रशांत निमकर, ममता अवताडे, आरती वांढरे, शहानूरबी अ गफ्फार, पांडुरंग टोंगे, अक्षता चौहान, विजय मेश्राम, माया ढुरके, स्वाती खरवडे, संतोष पारखी, रंजना उईके, शुभाष वाघडकर, महादेव खाडे, धीरज पाते, अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी व पदाधिकार्‍यांची नावे आहेत.

26 फेब्रुवारी रोजी 5 विषयांवरील ठराव: वणी नगरपालिकेने 26 फेब्रुवारी २०१८ रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी सभेच्या सूचनापत्रात 5 विषयांवर ठराव पारित करण्याबाबत चर्चा करण्याचे नमूद केले होते. परंतु नंतर आयोजित सभा रद्द करून 3 मार्च रोजी नगरपालिकेच्या सभागृहात घेण्यात आली. या आयोजित सभेत अनेक विषयांवरील ठराव पारित होणार होते. परंतु 3 मार्चच्या सभेत दोन विषय अतिरिक्त टाकण्यात आला आहे.

24 नगरसेवकांवर गुन्हा दाखल: सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी अर्जाद्वारे सभेच्या कामकाजाच्या व त्या अनुषंगाने पारित केलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत प्राप्त केली आहे. त्यात ठराव क्रमांक ३ व ७ पारीत करताना कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. कांबळे यांनी वणीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायाधीश सुधीर बोमीडवार यांनी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून वणी पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकारी, माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्षांसह 24 नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.