ETV Bharat / state

दोन चोरट्या महिलांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले; पोलीस कर्मचारी गजानन काळे यांची कौतुकास्पद कामगिरी - worker

मालेगाव येथे दिपाली यांच्यासह चोरट्या महिला देखील बसमधून खाली उतरल्या. काही वेळानंतर पर्समधून दागिने लंपास झाल्याची बाब दिपाली यांच्या लक्षात आली.

दोन महिलांनी पोलिसांनी पकडले
author img

By

Published : May 13, 2019, 11:27 PM IST

वाशिम - यवतमाळ-गंगापूर बसमध्ये प्रवास करणाऱ्या दीपाली आखाडे या महिलेचे दीड लाख रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम पर्सची चोरी करणाऱ्या दोन महिलांना मालेगाव पोलिसांनी पकडले. पोलीस गजानन काळे या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने या चोरांनी पकडले.

दोन महिलांनी पोलिसांनी पकडले

दिपाली किरण आखाडे (रा. डोणगाव जि.बुलडाणा) आपली मुलगी समृद्धी (वय १०) आणि अर्पित (वय दीड वर्षे) यांना घेवून गंगापूर-यवतमाळ बसने प्रवास करत होते. त्याच बसमध्ये पडदे विक्रीचे काम करणाऱया दोन महिला बसून होत्या. दरम्यान, दिपाली आखाडे ह्या बसच्या वाहकाकडून तिकीट घेण्यासाठी पर्समधून पैसे काढत असताना पर्समध्येच ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्या महिलांनी पाळत ठेवली. संधी मिळताच दागिने आणि काही रोख रक्कम लंपास केली.

मालेगाव येथे दिपाली यांच्यासह चोरट्या महिला देखील बसमधून खाली उतरल्या. काही वेळानंतर पर्समधून दागिने लंपास झाल्याची बाब दिपाली यांच्या लक्षात आली. त्या कावऱ्या बावऱ्या नजरेने लोकांना न्याहळत होत्या. कशातरी पायी महिला वेड्यागत करत असल्याचे पाहून. तितक्यात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी गजानन काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दिपाली आखाडे व त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही लहान मुलांना पोलिस स्टेशनमध्ये आणले व दिपाली यांना दुचाकीवर बसवून मालेगावच्या बाजारात चोरट्या महिलांचा शोध घेणे सुरू केले.

दोन्ही चोरट्या महिलांचा शोध घेताना सुदैवाने दोन्ही चोरट्या महिला एका बोळीत बसलेल्या आढळून आल्या व गजानन काळे यांना विचारताच दोघींनीही चोरीची कबुली देवून दागिने व पैसे परत केले. दरम्यान, घडलेल्या चोरीच्या घटनेची तत्काळ दखल घेवून त्या महिलेला न्याय मिळवून देणारे पोलीस कर्मचारी गजानन काळे यांचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह सर्वच स्तरातून कौतुक झाले.

Intro:अँकर:- यवतमाळ-गंगापूर बस मध्ये प्रवास करणाऱ्या दीपाली आखाडे या महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम पर्ससह चोरी करणाऱ्या दोन महिलांना मालेगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले गजानन काळे या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने पकडुब सतर्कतेचा आणि कर्तव्य दक्षतेचा परिचय करुण दिलाय

दिपाली किरण आखाडे डोणगाव जि.बुलडाणा आपली मुलगी समृद्धी वय १० वर्षे आणि अर्पीत वय दीड वर्षे यांना घेवून गंगापूर-यवतमाळ बसने प्रवास करित होती. त्याच बसमध्ये पडदे विक्रीचे काम करणा-या दोन महिला बसून होत्या. दरम्यान, दिपाली आखाडे ह्या बसच्या वाहकाकडून तिकीट घेण्यासाठी पर्समधून पैसे काढत असताना पर्समध्येच ठेवून असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्या महिलांनी पाळत ठेवली व संधी मिळताच दागिने आणि काही रोख रक्कम लंपास केली.

Body:मालेगाव येथे दिपाली यांच्यासह चोरट्या महिला देखील बसमधून खाली उतरून गेल्या काही वेळानंतर पर्समधून दागिने लंपास झाल्याची बाब दिपाली यांच्या लक्षात आली. त्या सैरावैरा पळत होत्या. कावऱ्या बावऱ्या नजरेने लोकांना न्याहळत होत्या.कशातरी पायी महिला वेड्यागत करत असल्याचे पाहून. तितक्यात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दिपाली आखाडे व त्यांच्यासोबत असलेल्या दोन्ही लहान मुलांना पोलिस स्टेशनमध्ये आणले व दिपाली यांना दुचाकीवर बसवून मालेगावच्या बाजारात चोरट्या महिलांचा शोध घेणे सुरू केले. Conclusion:दोन्ही चोरट्या महिलांचा शोध घेताना सुदैवाने दोन्ही चोरट्या महिला एका बोळीत बसलेल्या आढळून आल्या व गजानन काळे यांना विचारताच दोघींनीही चोरीची कबुली देवून दागिने व पैसे परत केले. दरम्यान, घडलेल्या चोरीच्या घटनेची तत्काळ दखल घेवून पिडित महिलेला न्याय मिळवून देणारे पोलिस कर्मचारी गजानन काळे यांचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्यासह सर्वच स्तरातून कौतुक झाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.