यवतमाळ - क्रिकेट सट्यातील आरोपीने ( cricket betting ) पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. त्याला नांदेड जिल्ह्यातील किनवट येथून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ( Pimpri Chinchwad Police arrested ) अटक केली होती. ही घटना 1 जुलै रोजी पहाटे तीन वाजे दरम्यान दारव्हा मार्गावरील हॉटेल ग्यॅनसनमध्ये घडली. या घटनेने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रामदेव मोहनलाल शर्मा ( 42), रा. नवीननगर, किनवट, जि. नांदेड), असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहै.
आयपीएल सामन्यावर सट्टा - 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल ( Mumbai Indians vs Delhi Capital ) या दोन संघातील आयपीएल सामन्यावर काही लोक सट्टा घेत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना ( Pimpri Chinchwad Police ) मिळाली होती. त्यानुसार सांगवी ठाणे हद्दीत छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सट्ट्याचे साहित्यही जप्त करण्यात आले होते. बनावट कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड घेऊन त्याचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यात विनोद अग्रवाल याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात रामदेव शर्मा याचा सहभाग आढळून आला.
किनवटमधून आरोपीला अटक - वरिष्ठांच्या परवानगीने पोलिस पथकाने किनवट गाठून आरोपीला अटक केली. अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत याच गुन्ह्याच्या अनुषंगाने काही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस दारव्हा मार्गावरील हॉटेलात थांबले. पोलिस फ्रेश होत असल्याची संधी साधून रामदेव शर्मा याने पोलिस कर्मचार्यांच्या हाताला झटका देऊन पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत गल्लीबोळातून आरोपी पळून गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
हेही वाचा- मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद - संजय राऊत