ETV Bharat / state

दिव्यांग कृष्णाची मुख्यमंत्री निधीस 'खाऊच्या पैशांची सहाय्यता'; जिल्ह्यातून 55 लाखांचा निधी

जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 49 लक्ष 67 हजार 461 रुपये जमा झाले आहेत. दानशूर व्यक्ती, विविध संघटना, पतसंस्था, प्रतिष्ठाने, लहान चिमुकले अशा 49 जणांनी इच्छित रकमेची देणगी दिली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीत 17 जणांनी 5 लक्ष 51 हजार 311 रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मदतनिधीसाठी जिल्ह्यातून एकूण 55 लक्ष 18 हजार 772 रुपये जमा झाले आहेत.

दिव्यांग कृष्णाची मुख्यमंत्री निधीस 'खाऊच्या पैशांची सहाय्यता'; जिल्ह्यातून 55 लाखांचा निधी
दिव्यांग कृष्णाची मुख्यमंत्री निधीस 'खाऊच्या पैशांची सहाय्यता'; जिल्ह्यातून 55 लाखांचा निधी
author img

By

Published : May 2, 2020, 12:31 PM IST

यवतमाळ - कोरोनाविरुध्दची लढाई शासन, प्रशासन, सर्व यंत्रणा, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आपल्या परीने लढत आहेत. या लढाईत प्रत्येक सुजाण नागरिक आपापल्या परीने शासनास मदत करीत आहेत. यवतमाळमध्येही एका दिव्यांग मुलाने वर्षभर जमविलेले ‘खाऊचे पैसे’ चक्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन आपल्या 'वाढदिवसाची अनोखी भेट' कोरोना लढाईसाठी दिली.

दिव्यांग कृष्णाची मुख्यमंत्री निधीस 'खाऊच्या पैशांची सहाय्यता'; जिल्ह्यातून 55 लाखांचा निधी
दिव्यांग कृष्णाची मुख्यमंत्री निधीस 'खाऊच्या पैशांची सहाय्यता'; जिल्ह्यातून 55 लाखांचा निधी

येथील वडगाव रोड भागातील जयसिंगपुरे ले-आऊटमध्ये राहणारा कृष्णा विनोद राऊत (13) हा जन्मत: दिव्यांग आहे. नुकताच त्याचा 13 वा वाढदिवस झाला. मला कोणीही वाढदिवसाला काहीही भेट आणू नका. तर, कोरोनाची लढाई नेटाने लढणाऱ्या आपल्या शासनाला मलाच ‘खाऊचे पैसे’ भेट द्यायचे आहेत, असे त्याने सर्वांना सांगितले. आपला वाढदिवस साजरा न करता वर्षभर जमवलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याची ही कल्पना त्याने आई, वडिलांना सांगितली. त्याचे वडील घरोघरी जाऊन हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर, आई गृहिणी आहे.

हातावर पोट असलेल्या त्याच्या पालकांनीही मुलाच्या मताचा आदर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या खाऊचे पैसे असलेली ‘मनी बँक’ जशीच्या तशी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे ठरवून राऊत कुटुंबीय थेट यवतमाळ तहसीलदारांकडे पोहचले. तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्याकडे कृष्णाने आपला ‘खाऊ’ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला. ही बाब जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना कळताच त्यांनी कृष्णाला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्याची व कुटंबाची आस्थेने विचारपूस केली. यावेळी कृष्णाचे वडील विनोद राऊतही उपस्थित होते.

जिल्ह्यातून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मदतनिधीसाठी 55 लाखांची रक्कम जमा झाली आहे. कोरोनाच्या या लढाईत प्रत्येक जण शासनास मदत करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधीकरीता आतापर्यंत 49 लक्ष 67 हजार 461 रुपये जमा करण्यात आले आहेत. यात काही दानशूर व्यक्ती, विविध संघटना, पतसंस्था, प्रतिष्ठाने, लहान चिमुकले आदींचा समावेश आहे. 1 मेपर्यंत एकूण 49 जणांच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे निधी जमा झाला आहे. तर, पंतप्रधान सहायता निधीकरीता एकूण 17 जणांच्यावतीने 5 लक्ष 51 हजार 311 रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मदतनिधीसाठी जिल्ह्यातून एकूण 55 लक्ष 18 हजार 772 रुपये जमा झाले आहेत. कोरोनाच्या या लढाईत प्रत्येकाने आपले योगदान देण्याकरीता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे. यासाठी त्यांनी मदतनिधी स्वीकारणाऱ्या बँक खात्यांची माहिती दिली आहे.

येथे मदतनिधी जमा करावा

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19, बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023, शाखा कोड 00300, आयएफएससी कोड SBIN0000300 येथे थेट धनादेश जमा करू शकतो.

किंवा

मदतीचे धनादेश यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडेसुध्दा जमा करता येतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.