ETV Bharat / state

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार; नागरिकांनी दिला चोप

author img

By

Published : Aug 7, 2021, 11:07 PM IST

यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला. गावकऱ्यांच्या तावडीतून पोलिसांनी शिक्षकाला सोडवून रुग्णालयात दाखल केले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

यवतमाळ - यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या घटनेने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम चोप दिला. गावकऱ्यांच्या तावडीतून पोलिसांनी शिक्षकाला सोडवून रुग्णालयात दाखल केले.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा - 'बोथबोडन' शेतकरी आत्महत्याग्रस्त गावाचे नाव, 2003 पासून 30 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण राठोड (51, रा. जवळा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

अज्ञानाचा फायदा घेत केला अत्याचार

आरोपी शिक्षक अरुण हरीदास राठोड हा पीडितेला अभ्यास कसा करायचा व मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करशील तर तुला चांगले मार्क मिळतील, असे आमिष दाखवून रोज वर्ग सुटल्यावर थांबवून घेत होता. पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपी शिक्षक मागील दोन महिण्यांपासून वर्ग खोलीमध्ये जबरदस्तीने वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिक्षकाला चंगलाच चोप दिला व त्याची दुचाकी पेटवून दिली.

याप्रकरणी केलेल्या तक्रारीवरून कलम ३७६ (२)(एन)(एफ) भा.दं.वि सहकलम ४, ६ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार करीत आहे.

हेही वाचा - एक लीटरमध्ये दीड एकराची आंतरमशागत, साठ वर्षीय रँचो शेतकऱ्याने बनविले टाकावू पासून टिकावू यंत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.