यवतमाळ - गेल्या काही दिवसांपासून पेट्राल-डिझेलच्या किंमतीमध्ये प्रचंड चढ-उत्तार पाहायला मिळत असून किंमती गगणाला भिडल्या आहेत. आज यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोलचे दर 91.64 रुपये प्रती लिटरवर पोहचले असून डिझेलचा दरही 80.59 रुपयांवर गेले आहेत.
जिल्ह्यात कमी अधिक फरकाने वाढ
यवतमाळ जिल्ह्यातील विविध पेट्राल पंपावरीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तफावत पाहायला मिळत आहे. हिंन्दुस्थान पेट्रोलियम व भारत गॅस पेट्रोलियम पंपावर आज पेट्रोलचे दर 92 तर, डिझेल 81.65 प्रति लिटर आहे. तर इसार पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर 92.88 प्रति लिटर आहे. दैनंदिन होत असलेल्या पेट्रोलच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
चार दिवसात झाली वाढ
पाच दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर हे 89 .81 पैशावर होते. तर दिवसागणिक 25 ते 26 पैसे दर दिवशी वाढ झाली असल्याने पेट्रोलचे दर हे 92 रुपयांच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. या पेट्रोल दरवाढीचा नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - पुण्यातील दुर्दैवी घटना, अपघातात वडिलांचा मृत्यू, मुलावर गुन्हा दाखल