यवतमाळ- प्रचाराची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात आली आहे. भाजपचे उमेदवार आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी राळेगाव मतदारसंघात जाऊन मतदारांना मतरुपी आशीर्वाद मागत आहे. आज मतदार संघातील जोडमोहा येथे ते प्रचारासाठी आहे होते. यावेळी जनता युतीच्या बाजूने असून मागील पाच वर्षात जे विकास कामे केली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चितच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांच्याशी त्यांची लक्षवेधी लढत होणार आहे.
हेही वाचा- ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर