यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. तशी रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या प्रमानातही वाढ होत आहे. आज जिल्ह्याला साडेचार ते पाच हजार ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होत असून याचे दर दीडशे रुपयांनी वाढले आहे. सुरुवातीला 300 रुपये दराने 60 क्युबिक मीटरचे एक सिलिंडर मिळत होते. मात्र आता हेच सिलिंडर 450 रुपयांमध्ये मिळत आहे. त्यातही एक दिवसाआड ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने जिल्हातील 19 खासगी कोविड रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, सुपरस्पेशालिटी रुग्णालयांवरच ऑक्सिजनची वेळ आल्याचे दिसून येत आहे.
छत्तीसगड, पुण्यावरून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा
जिल्ह्यात कुठेच ऑक्सिजनचा प्लांट नसल्याने पुणे जिल्ह्यातील चाकण आणि छत्तीसगड या राज्यातील भिलाई येथील ऑक्सिजन स्टील प्लांटवरून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्याला करण्यात येतो. इथून आलेले लिक्विड ऑक्सिजन हे एमआयडिसीमधील मुकुंदराय गॅस एजन्सी आणि वर्ध्यातील देवळी येथील ऑक्सिजन प्लांटवर ऑक्सिजन सिलिंडर भरण्यात येते. आणि येथून जिल्ह्यातील 19 खासगी कोविड रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुरविण्यात येते. एक दिवस जरी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला तर बाधितांवर उपचार करणे कठीण जाणार आहे.
दररोज साडेचार हजार ऑक्सिजन सिलिंडर
जिल्ह्यात कोरोना काळापूर्वी खासगी रुग्णालयात 250 व जिल्हा शासकीय रुग्णालयात 90 असे सर्व मिळून 350 ऑक्सीजन सिलिंडर लागत होते. मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली तशी ऑक्सिजनच्या सिलिंडरच्या प्रमाणातही वाढ झाली. आज रोजी एकट्या जिल्हा शासकीय रुग्णालय व सुपर स्पेशल, सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक हजार 500 सिलिंडर व 19 खासगी कोविड रुग्णालयात 2500 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यक भासत आहे.
क्युबिक मीटरवर दहा रुपये खर्च
जिल्ह्यात लिक्विड स्वरूपात आलेले ऑक्सिजन हे सुरुवातीला तीन रुपये क्युबिक मीटर वाहतूक खर्च होता. तो आता दहा रुपये क्युबिक मीटर झालेला आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरची दरही वाढले आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात पुसद, उमरखेड, वनी आणि यवतमाळ या ठिकाणी 15 गाड्या मार्फत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केल्या जात आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राला 'रेमडेसिवीर' देण्यास केंद्राची बंदी; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप