यवतमाळ - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नरसापूर रोड परिसरात कळंब येथील शाहीन शेख रहीम (रा. कळंब) यांच्या राईस मिल कारखाना बनविण्याचे काम सुरू होते. मजूर काम करीत असताना मिलचे लोखंडी शेड अंगावर पडून तीन मजुरांपैकी एकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.
आदीलाबाद येथील मजूर -
मागील आठ दिवसापासून या राईस मिलचे शेडचे बांधकाम सुरू होते. याठिकाणी काम सुरू असताना अचानक पोस घसरल्याने हे संपूर्ण शेड खाली कोसळले. यात मोहम्मद निजामुद्दीन मोहम्मद मज्जित (वय 63, रा. आदिलाबाद) असे मृत्यू आहे. जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मिलमध्ये आदिलाबाद येथील पाच मजूर काम करीत होते. दोघे जण स्वयंपाक करण्यासाठी गेल्यामुळे वाचले. पुढील तपास ठाणेदार राजेश साळवे करीत आहेत.