यवतमाळ - पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हिवळणी ईजरा घाटात विटा घेऊन येणारा भरधाव ट्रॅक्टर उलटला. त्यात चालक जागीच ठार झाला असून ही घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर राठोड (रा. गुंज, ता. महागाव) असे मृताचे नाव आहे.
नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
महागाव तालुक्यातील गुंज येथील ट्रॅक्टर (एमएच२९, ३२२) हा ट्रॅक्टर विटा घेऊन भरधाव वेगाने पुसद तालुक्यातील हिवळणी इजारा येथे खाली करण्यासाठी घाटातून जात असताना चालक मृतक ज्ञानेश्वर राठोड याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या कडेवर पलटी होऊन कोसळला. हा अपघातात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरच्या चालकांचे डोके संपूर्ण शरीर ट्रॅक्टरच्या खाली आल्याने चालकाच्या डोक्याचा संपूर्ण चेंदामेंदा झाला.
याबाबतची माहिती खंडाळा पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक गोपाल चावळीकर यांनी त्यांच्या सहकारी पोलिसांना तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल चावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या भीषण अपघाताची संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली आहे.