यवतमाळ : जिल्ह्यात मागील 24 तासात 1163 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आले असून 1011 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 20 मृत्यू झाले. यातील 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, 5 मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये, तर 4 मृत्यू खासगी रुग्णालयात झाले. शनिवारी (24 एप्रिल) झालेल्या एकूण 20 मृत्युपैकी 4 मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहेत.
पॉझिटिव्हीटी दर 12.27-
सद्यस्थितीत जिल्ह्यात 5972 रुग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी रुग्णालयात 2858, तर गृह विलगीकरणात 3114 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 46704 झाली आहे. गेल्या 24 तासात 1011 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 39659 झाली. तर जिल्ह्यात एकूण 1073 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 12.27 टक्के असून मृत्युदर 2.30 टक्के आहे. सक्रिय 1163 जणांमध्ये 653 पुरुष आणि 510 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 371 रुग्ण, दिग्रस 163, वणी 147, उमरखेड 90, पांढरकवडा 67, झरी 49, दारव्हा 45, घाटंजी 45, मारेगाव 40, बाभुळगाव 36, महागाव 23, नेर 22, आर्णि 20, कळंब 16, पुसद 12, राळेगाव 8 आणि इतर शहरातील 9 रुग्ण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत 380774 नमुने पाठविले असून यापैकी 376277 प्राप्त, तर 4497 अप्राप्त आहेत. तसेच 329573 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.