ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात 14 जणांना कोरोनाची लागण; 21 कोरोनामुक्त, तर एकाचा मृत्यू - yavatmal corona cases

जिल्ह्यात आज नव्याने 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. तर, 21 जण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 517 एवढी आहे. यापैकी 357 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात 16 मृत्यूंची नोंद आहे.

आज 21 जणांना सुट्टी;एकाचा मृत्यु ; 14 जण नव्याने पॉझिटिव्ह

author img

By

Published : Jul 17, 2020, 8:52 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असतांनाच आज(शुक्रवार) 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह आलेले 21 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, आज जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून 14 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही 70 वर्षीय पुरुष असून पुसद येथील ज्योती नगरातील रहिवासी आहे. ते 13 जुलैरोजी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल झाले होते. तसेच जिल्ह्यात नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 14 जणांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील डोर्लीपुरा (पाटीपूरा) येथील एक पुरुष, भोसा येथील सारस्वती ले-आऊट येथील एक पुरुष, यवतमाळ येथील दोन महिला, पुसद शहरातील गायमुखी नगर येथील एक पुरुष, पुसद शहरातील संभाजी नगर येथील दोन महिला, पुसद शहरातील खाटीक वॉर्ड येथील दोन पुरुष, उमरखेड शहरातील वॉर्ड क्रमांक 1 येथील पुरुष, उमरखेड येथील एक पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील गांधी नगर येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील एक महिला पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत 152 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण होते. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या 151 वर आली. तसेच जिल्ह्यात आज 14 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हा आकडा 165 वर पोहचला आहे. मात्र, 'पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 21 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 144 झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 99 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले 45 जण आहेत.

जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 517 एवढी आहे. यापैकी 357 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर, जिल्ह्यात 16 मृत्यूंची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 132 जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 58 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 8 हजार 624 नमुने पाठविले असून यापैकी 8 हजार 520 प्राप्त तर 104 अप्राप्त आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.