ETV Bharat / state

देशी जुगाड : हमालीच्या कटल्याला दुचाकीचा आधार; हारून शेख यांची शक्कल

या देशी जुगाडामुळे त्यांना कमी मेहनतीत जास्त मजुरी मिळत आहे.

देशी जुगाड
author img

By

Published : Jul 24, 2019, 11:16 AM IST

यवतमाळ - आर्णी येथील हारून नासर शेख यांनी रिक्षा कटल्याला जुनी बजाज एमएटी दुचाकी जोडून अनोखी गाडी तयार केली आहे. या देशी जुगाडामुळे त्यांना कमी मेहनतीत जास्त मजुरी मिळत आहे. त्यांच्या या आयडीयाची सध्या आर्णीत चर्चा आहे.

शेख यांना दुचाकी रिक्षा कटल्याला लावण्यासाठी अंदाजे ८ हजार रुपये खर्च त्यांना आला. यातून त्यांनी हमाली करण्याचा नवा अंदाज निर्माण केला आहे. पाठीवर पोते घेवून ते कटल्यात टाकतात आणि दुचाकीवर बसून ओढतात. शेख हारून जेव्हा दुचाकीवरून जात असतात तेव्हा सर्वांचे लक्ष वेधले जाते. शेख हारून यांचे वय सध्या चाळीस वर्ष असून शहरातील मोमीनपूरा येथे पत्नी, एक मुलगा एक विवाहीत मुलगी यांच्यासोबत राहतात. हमाली करूनच ते आपल्या कुटुंबीयांचा उदरर्निवाह करतात.

देशी जुगाड

या गाडीला दिवसाला फक्त शंभर रुपयाचे पेट्रोल लागते. यामुळे जास्त काम होते परिणामी मजुरी पण जास्त मिळते. दाभडी येथील दिंगाबर गाते व राजू गाते असे दोघे भाऊ आर्णी येथील शास्त्री नगरातील आडकोजी महाराज मंदिराजवळ सायकल दुरुस्तीचे काम करतात. त्या दोघांनी ही गाडी तयार केली आहे.

Intro:हमालीच्या कटल्याला दूचाकीचा आधार
हारून शेखची हमालीची नवी शक्कलBody:यवतमाळ : आर्णी येथील रिक्षा कटल्यावर हमाली करणारे हारुन नासर शेख हे वयाच्या चौदाव्या वर्षापासून हमाली करीत आहे. पाठीवर पोते ऊचलून पोते कटल्यात टाकूण पायडल मारत ओझे ओडावे लागत होते. शेख हारुन यांचे वय ही वाढत असल्याने दिवसेन दिवस ताकत कमी होत चालेली आहे. यामूळे मागील एक महिण्या आधी शेख हारुन यांनी आपली नवी शक्कल लढवत घरचीच जूनी बजाज ऐमेटी दूचाकी रिक्षा कटल्याला लावली. दूचाकी रिक्षा कटल्याला लावण्याची अंदाजे आठ हजार रुपये खर्च त्यांना आला. हमाली करण्याचा नवा अंदाज निर्माण केला आहे. पाठीवर पोते घेवून कटल्यात टाकतात परंतु कटला ओडण्याची गरज नाहीतर थेट दूचाकीवर बसून रिक्षा कटला ओडतात. शेख हारून जेव्हा दूचाकीस्वार कटला घेवून जातात तर ये जा करणाचे लक्षवेधून घेत आहे. शेख हारून यांचे वयवर्ष चाळीस असून शहरातील मोमीनपूरा येथे पत्नी, एक मूलगा एक विवाहीत मूलगीअसून हमाली करूनच आपल्या कूंटूबीयाचा उदरर्नीवाह करतात. वर्ग चौर्थी पर्यत शिक्षण घेणार्‍या हमाल शेख हारुनचे इंजिनिरींग दिंमाग लावत आपल्या हमालीचा नव्या अंदाज निर्माण केला. दिवसभर सारखेच हमालीचे काम राहिल्यास एका दिवसाला फक्त शंभर रुपयाचे पेट्रोल लागते. यामूळे जास्त काम राहिले तर मजूरी ही जास्त पडते. व ओझेवढण्याची ताकत ही कमीत कमी लागते. यामूळे दूचाकी रिक्षा कटल्याला लावल्याने दूचाकीवर बसून ओझे वोढावे वाटले तर ओडतो नाहीतर दूचाकीला पडून रिक्षा कटला धकलतो. अशी दूहेरी काम होत असल्याने कूठलीच अडचण निर्माण होत नाही. दाभडी येथील दिंगाबर गाते व राजू गाते नामक दोघे भाऊ आर्णी येथील शास्ञी नगरातील
आडकोजी महाराज मंदीरा जवळीक सायकल दूरुस्तीचे दूकान आहे. येथे सायकल दूरुस्तीचे काम करतात दिंगाबर व राजू यांनीच आपल्या सायकल दूरुस्ती दूकानात शेख हारुन यांना हमाली करण्यासाठी दूचाकीस्वार रिक्षा कटला तयार करून दिला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.