यवतमाळ - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 57 जण पॉझिटिव्ह आले असून 20 जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 20 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 439 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 57 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 382 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 372 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,226 झाली आहे. आज 20 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरुवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9,087 आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 346 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 91,504 नमुने पाठविले असून यापैकी 91,093 प्राप्त तर 411 अप्राप्त आहेत. तसेच 80,867 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसापासून कमी होत आहे. मात्र, अनेक ठिकाणी लोक सोशल डिस्टन्सचे आणि कोरोना नियमांचे पालन करत नसल्याने येत्या दिवसांत रुग्णसंख्या वाढण्याची भीती शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.