ETV Bharat / state

प्रेमसंबंधातून लग्नाच्या ४ दिवसापूर्वी जन्मले बाळ, भावी वर-वधूने 'नकोशी'ला सोडले जंगलात - yavatmal

लग्न ३-४ दिवसावर येऊन ठेपले होते. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात तिची प्रसुती करण्यात आली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, लग्नाला ४ दिवस बाकी असताना मुलीला कस ठेवायचे? नातेवाईक काय म्हणतील? या भीतीने त्यांनी तिला मनदेवच्या जंगलात सोडले.

यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 25, 2019, 4:58 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील मनदेवच्या जंगलात स्त्री जातीचे नवजात बाळ आढळून आले आहे. लग्नापूर्वीच्या प्रमेसंबंधातून हे बाळ जन्माला आल्याने त्यांनी तिला जंगलात सोडले. याप्रकरणी तरुण आणि तरुणी दोघांनाही ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटनेबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

दिग्रस तालुक्यातील तरुणाचे मामाच्या मुलीशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही नात्यातीलच असल्याने घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न जुळले. येत्या २६ एप्रिलला दोघांचाही विवाह नियोजित होता. मात्र, मुलीला लग्नापूर्वीच गर्भधारणा झाली. त्यातच लग्नही ३-४ दिवसावर येऊन ठेपले होते. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात तिची प्रसुती करण्यात आली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, लग्नाला ४ दिवस बाकी असताना मुलीला कस ठेवायचे? नातेवाईक काय म्हणतील? या भीतीने त्यांनी तिला मनदेवच्या जंगलात सोडले.

दुपारच्या तळपत्या उन्हात बाळ तिथेच पडलेले होते. त्यानंतर जंगलात चारोळ्या वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेला ते बाळ दिसले. त्यांनी गावातील पोलीस पाटलाच्या मदतीने ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता तब्बल ४ दिवसानंतर तरुण-तरुणीचा शोध लावण्यात पोलिसांनी यश मिळाले. त्यामधून तरुण दिग्रस तालुक्यातील, तर तरुणी दारव्हा तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे.

Intro:लग्नापूर्वीचे कृत्य लपविण्यासाठी नकोशी’ला जंगलात सोडले
यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडून दोघांनाही अटकBody:यवतमाळ : लग्नापूर्वीच प्रेमसंबंधातून बाळ जन्मालाआल्याने आपले कृत्य लपविण्यासाठी भावी वधू-वरानेच नकोशीला मनदेवच्या जंगलात
सोडले होते. यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या तपासातून या घटनेचे रहस्य उलगडले आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिग्रस तालुक्यातील युवकाचे मामाच्या मुलीशी
प्रेमसूत जुळले. यातून युवतीला गर्भधारणा झाली. दोघेही नात्यातीलच असल्याने लग्नही
जुळविण्यात आले. आगामी २६ एप्रिल ला विवाह सुद्घा नियोजित होता. परंतु विवाहापूर्वीच प्रेमसंबंधातून गर्भधारणा होऊनतब्बल नऊ महिन्याचा कालावधी उलटल्याने आणि लग्न अवघ्या तीन-चार दिवसावरच शिल्लक असल्याने चांगले वाटणार नाही, म्हणून गर्भपाताचा कट रचण्यात आला. त्यानूसार यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गर्भाची वाढ होऊन प्रसूतीच्या कळाही सुरू झाल्याने त्यांचा कट फसला.गर्भाला पूर्ण दिवस झाल्यामुळे कुमारी मातेची डॉक्टरांनी कृत्रिमरीत्या प्रसूती केली. यावेळी तरुणीने कन्यारत्नाला जन्म दिला. मात्र लग्नापूर्वीच हे कृत्य समाजासमोर येउ नये, यासाठी त्या बालिकेला जन्म देणारी आई व होणाऱ्या पतीने
आईच्या मदतीने यवतमाळ-आर्णी रोडवरील मनदेवाच्या जंगलातील एका वारुळाजवळ ९ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास बाळाला सोडून निघून गेले. दुपारच्या तळपत्या
उन्हात ते बाळ तिथेच होते. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे त्या जंगलामध्ये
चारोल्या जमा करण्याकरिता एक ‘जनाबाई’ अवतरली. चारोल्या जमा करता करता जनाबाईला बाळाचा आवाज ऐकू आला. ती पाहण्यासाठी गेली असता बाळ तिच्या नजरेस
पडले. बाळ घेऊन जनाबाईने गावातील पोलीस पाटलाची भेट घेतली. यवतमाळ ग्रामीण पोलीस
स्टेशनला माहिती देऊन फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस ठाण्याचे दीपक पवार, सहाय्यक
संजय शिंदे, हेड कॉन्स्टेबल ढवळे, ब्राम्हणकर यांनी हे बाळ कोणाचे आहे, याचा शोध घेण्यास
सुरुवात केली. जिल्ह्यातील काही दवाखान्यांची कसून चौकशी केली. अखेर पोलिसांना तब्बल
चार दिवसानंतर युवक-युवतीचा शोध लावण्यात यश आले आहे. त्यात युवक दिग्रस तालुक्यातील
तर युवती दारव्हा तालुक्यातील असल्याचे पुढे आले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.Conclusion:(मन देव जंगलात आढळले नवजात अभरक
ही बातमी 15 एप्रिलला पाठविली होती)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.