ETV Bharat / state

यवतमाळमध्ये आणखी 10 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, संख्या 24 वर

सद्यस्थितीत जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 24 वर गेली असून, एकूण रुग्ण 123 झाले आहेत. यापैकी 99 जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत, असे प्रशासनाने कळवले आहे.

corona
कोरोना व्हायरस
author img

By

Published : May 29, 2020, 1:33 PM IST

यवतमाळ - कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 10 जणांचे रिपोर्ट नव्याने पॉझेटिव्ह आहे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 वर गेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गुरुवारी रात्री 23 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 10 पॉझिटिव्ह, 12 निगेटिव्ह आणि एक रिपोर्ट अचूक निदान नसल्याचे कळवण्यात आले आहे.

दरम्यान, 10 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आठ जण दिग्रस येथील, तर दोन जण पुसद येथील आहेत. हे सर्व जण पॉझिटिव्ह रुग्णांच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट) आहेत. दिग्रस येथील सहा जण एकाच कुटुंबातील आहेत. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील इतर नागरिकांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहेत.

जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या संकटाचा सामना अहोरात्र करत आहे. मात्र, असे असताना दिग्रस येथे मुंबईवरून आलेल्या नागरिकांना गृह विलगीकरणात ठेवण्याचे सक्त आदेश असताना त्यांनी कुटुंबासह पार्टी केली. यातून ते पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले. त्यामुळे या सर्वांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी शासनाच्या सुचनांचे सक्त पालन करणे आपल्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.

मुंबईवरून आलेल्या या नागरिकांनी निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 24 वर गेली असून, एकूण रुग्ण 123 झाले आहेत. यापैकी 99 जण उपचाराअंती बरे होऊन घरी गेले आहेत, असे प्रशासनाने कळवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.