ETV Bharat / state

नवरात्री विशेष : उमरखेड शहरातील जाज्वल्य शक्तिपीठ रेणुकामाता - रेणुकामाता मंदिर उमरखेड नवरात्री

उमरखेड शहरातील जाज्वल्य शक्तिपीठ म्हणून प्रसिध्द असलेल्या रेणुकामाता मंदिरात नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली असून शहरातीलच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातून देवीच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात गर्दी करत आहेत.

रेणुकामाता मंदिर उमरखेड
author img

By

Published : Oct 1, 2019, 1:18 PM IST

यवतमाळ - उमरखेड शहरातील जाज्वल्य शक्तिपीठ म्हणून प्रसिध्द असलेल्या रेणुकामाता मंदिरात नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली आहे. शहरातीलच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

रेणुकामाता मंदिर उमरखेड

आठव्या शतकातील सुप्रसिध्द संस्कृत नाटककार भवभुती यांच्या एका नाटकाच्या प्रस्तावनेत जन्मस्थानाच्या खुणा सांगताना उंच टेकडीवर वसलेल्या पूर्वाभिमुख रेणुकामातेच्या (तांदळा) चौथारा मंदिराचा उल्लेख सापडतो. भवभुतीच्या अगोदर पासूनच रेणूकेचा 'तांदळा' स्थापन करुन पुजेची सर्वत्र सुरुवात होत होती. तांदळा म्हणजे माहूर दर्शनास गेल्यावर मोवाळे तलावात डुबकी मारुन, तळाचा दगड वर आणून त्यास शेंदूर विलेपन, डोळे, टोप इत्यादी गोष्टी अर्चन करुन रेणूकेची स्थापना करणे. या मूर्तीस्वरुपी दगडास तांदळा म्हणतात.

हेही वाचा - यवतमाळमध्ये बालाजी दुर्गा उत्सव मंडळाने साकारली 'वैष्णोदेवी धाम'ची प्रतिकृती

मुंबई-मुंबादेवी, अमरावती-अंबादेवी, आंध्रप्रदेश-यल्लम्मा, तेलवाडा-कामाक्षी, मुळावा-रेणुका, उमरखेड-रेणुका माता अशी अनेक देवींची तांदळा स्वरुपातील मंदिरे आहेत. पुरातन व ऐतिहासिक महत्व असलेल्या मंदिराचे जिर्णोध्दार कार्य चिन्मयमुर्ती मठाचे चवथे मठाधिपती प.पु. शिवरामानंद महाराज यांनी पूर्ण करुन शके १८२१ म्हणजे सन १७९९ मध्ये या मंदिरात देवीची पुर्नस्थापना केली. त्याकाळी हा परिसर जंगलमय असल्याने लोक क्वचित प्रसंगी दर्शनास जात. त्यानंतर चिन्मयमुर्ती संस्थानने ह्या देवीची देखरेख व पुजा सांभ भानेगांवकर परिवारावर सोपवली. सन १९४२ साली कै. रामेश्वर परदेशी सुतार या देवीभक्ताने देवीचे मंदिर बांधले. तर, मंदिराच्या पायऱ्यांचे काम लक्कडदास महाराज यांनी पूर्ण केले.

हेही वाचा - नवसाला पावणारी केळापूरची 'जगदंबा'
१९७५ पासून जिर्णोध्दार समिती देवीच्या मंदिर रस्त्याची, पाण्याची, देवीभक्तांच्या दर्शनाची सर्व व्यवस्था सांभळत आहे. त्यांना देवीभक्तांचीही सढळ हाताने मदत आहे. नुकतेच शासनाच्या पर्यटन विभागाने या मंदिरास 'क' दर्जा पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केले आहे.

हेही वाचा - 'बुढा हो या जवान सभी करे मतदान', पुसद तालुक्यात मतदार जनजागृती

Intro:Body:यवतमाळ : उमरखेड शहरातील जाज्वल्य शक्तिपिठ म्हणून प्रसिध्द असलेल्या रेणुकामाता मंदिरात नवरात्र मोहत्सवाची सुरुवात झाली. त्यावेळी शहरातीलच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातून देवी भक्तजांनी प्रचंड गर्दी केली. आठव्या शतकातील सुप्रसिध्द संस्कृत नाटककार भवभुती यांनी आपल्या एका नाटकाच्या प्रस्तावनत जन्मस्थानाच्या खुणा सांगताना उंच टेकडीवर वसलेल्या पूर्वाभिमुख असलेल्या रेणूकामातेच्या (तांदळा) चौथारा मंदिराचा उल्लेख सापडतो. भवभुतीच्या अगोदर पासूनच रेणूकेचा 'तांदळा' स्थापन करुन पुजेची सर्वत्र सुरुवात होती. तांदळा म्हणजे माहूर दर्शनास गेल्यावर मोवाळे तलावात डुबकी मारुन, तळाचा दगड वर आणून त्यास शेंदूर विलेपन, डोळे, टोप इत्यादी गोष्टी अर्चन करुन रेणूकेची स्थापना करणे. या मुर्तीस्वरुपी दगडास तांदळा म्हणतात. मुंबई-मुंबादेवी, अमरावती-अंबादेवी, आंध्रप्रदेश-यल्लम्मा, तेलवाडा-कामाक्षी, मुळावा-रेणुका, उमरखेड-रेणुका माता अशी अनेक देवीची तांदळा स्वरुप मंदिरे आहेत. पुरातन व ऐतिहासीक महत्व असलेल्या मंदिराचे जिर्णोध्दार कार्य चिन्मयमुर्ती मठाचे चवथे मठाधिपती प. पु. शिवरामानंद महाराज यांनी पूर्ण करुन शके १८२१ म्हणजे सन १७९९ मध्ये या मंदिरामध्ये देवीची पुनस्थापना केली. त्याकाळी हा परिसर जंगलमय असल्याने लोक क्वचीत प्रसंगी दर्शनास जात. त्यानंतर चिन्मयमुर्ती संस्थानने हया देवीची देखरेख व पुजा सांभ भानेगांवकर परिवारावर सोपवली. सन १९४२ साली कै. रामेश्वर परदेशी सुतार या देवीभक्ताने देवीचे मंदिर बांधले. तर देवीच्या पाय-याचे काम लक्कडदास महाराज या सत्पुरुषाने पूर्ण केले. १९७५ पासून जिर्णोध्दार समिती देवीच्या मंदिराची रस्त्याची, पाण्याची, देवीभक्तांच्या दर्शनाची सर्व व्यवस्था उत्कृष्ठ सांभळत आहे. त्यांना देवीभक्तांचीही सढळ हाताने मदत आहे. नुकताच शासनाच्या पर्यटन विभागाने या मंदिरास 'क' दर्जा पर्यटन स्थळ म्हणून जाहीर केले आहे.

mh_ytl_02_umerkhad_reukamata_vis_byte_7204456Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.