ETV Bharat / state

अनैतिक संबंधातून पतीची हत्या; चार संशयित ताब्यात - वणी पोलीस

रासा येथे राहणाऱ्या निलेश सुधाकर चौधरी या 30 वर्षीय युवकाचा परिसरातील तलावाजवळ 29 ऑगस्टला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्याच्या शरीरावर जखमांचे व्रण असल्याने आत्महत्या की घातपात असा संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच मृतकाच्या परिवाराने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांना त्या दिशेने तपास करण्याची मागणी केली होती.

वणी पोलीस
वणी पोलीस
author img

By

Published : Sep 17, 2021, 6:03 PM IST

Updated : Sep 17, 2021, 6:13 PM IST

यवतमाळ - वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रासा येथे वास्तव्यास असलेल्या निलेश सुधाकर चौधरी (वय, 30) या तरुणाचा 29 ऑगस्टला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. आत्महत्या की घातपात असा संभ्रम निर्माण झालेला असताना तपास अधिकाऱ्यांनी अनैतिक संबंधातून निलेशची हत्या झाल्याचा उलगडा केला असून चौघांना ताब्यात घेतले आहे. चंद्रशेखर दुर्गे (33), आशिष पिदूरकर (22), योगेश उघडे (20), गौरव दोरखंडे (24) सर्व राहणार रासा असे आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

काय आहे प्रकरण?

चंद्रशेखर दुर्गे याचे मृतकाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. संबंधात तिचा पती अडसर ठरत असल्याने त्याने नियोजन करत मृतक निलेशची हत्या करण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी मृतकाला रासा गावाच्या फुलोरा जंगलात नेण्यात आले आणि त्या चौघांनी त्याचा गळा आवळला. लगतच असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचा बनाव रचला. या प्रकरणात चार आरोपी सोबतच एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रासा येथे राहणाऱ्या निलेश सुधाकर चौधरी या 30 वर्षीय युवकाचा परिसरातील तलावाजवळ 29 ऑगस्टला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्याच्या शरीरावर जखमांचे व्रण असल्याने आत्महत्या की घातपात असा संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच मृतकाच्या परिवाराने हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांना त्या दिशेने तपास करण्याची मागणी केली होती. तपास अधिकारी आनंद पिंगळे यांनी तपास केले. 30 ते 40 जणांची चौकशी करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या तपासाची गती वाढवण्यात आल्यानंतर संबंधीत घटनेचा उलगडा झाला.

हेही वाचा - सोलापूर : मोदींचा वाढदिवस युवक काँग्रेसने गोट्या खेळून केला साजरा

Last Updated : Sep 17, 2021, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.