ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

author img

By

Published : May 6, 2021, 9:59 PM IST

Updated : May 7, 2021, 2:53 AM IST

सद्यस्थितीत जिल्ह्यात 6937 सक्रिय बाधित रुग्ण असून यापैकी रुग्णालयात भरती 2804 तर गृह विलगीकरणात 4133 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 59634 झाली आहे. 24 तासात 983 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 51282 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1415 मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 13.10 तर मृत्यूदर 2.37 आहे.

यवतमाळ कोरोना
यवतमाळ कोरोना

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पार गेल्यानंतर आज (गुरुवार) सुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 24 तासात 919 जण बाधित तर 983 जण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात एकूण 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी एकूण 6686 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहे. यापैकी 919 जण नव्याने बाधित आले तर 5767 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच 24 तासात जिल्ह्यात 983 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये कोरोना रिकव्हरी रेट वाढला

6937 सक्रिय रुग्ण

557 पुरुष आणि 362 महिला कोरोनाबाधित

गुरुवारी कोरोनाबाधित आलेल्या 919 जणांमध्ये 557 पुरुष आणि 362 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 185 बाधित रुग्ण, वणी 134, दारव्हा 101, उमरखेड 84, पांढरकवडा 60, घाटंजी 55, दिग्रस 53, नेर 41, पुसद 33, आर्णी 30, महागाव 30, बाभूळगाव 26, झरीजामणी 26, राळेगाव 22, मारेगाव 18, कळंब 16 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.

रुग्णालयातील बेडची उपलब्धता

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 515 बेड रुग्णांसाठी उपयोगात आहे तर 62 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील सहा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 360 बेडपैकी 181 रुग्णांसाठी उपयोगात आहे तर 179 बेड शिल्लक आहे. जिल्ह्यातील 36 कोविड केअर सेंटरमध्ये एकूण 2873 बेडपैकी 1480 उपयोगात तर 1393 शिल्लक आणि 29 खाजगी कोविड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 720 उपयोगात तर 324 बेड शिल्लक आहेत.

हेही वाचा-सोनू सूदच्या मदतीनंतर चर्चेत आलेली पुण्याची आजी पुन्हा रस्त्यावर

Last Updated : May 7, 2021, 2:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.