यवतमाळ - दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. केंद्र सरकार दररोज पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरचे दर वाढवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. इंधन दरवाढीविरोदात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सिलिंडरला तिरडी बांधून अंत्ययात्रा काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
'अडचणीच्या काळात इंधन दरवाढ'
आज कोरोनाच्या संकटामुळे शेतीसह सर्वच क्षेत्रातील उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कामगारांना काम नाही. या परिस्थितीमुळे सर्वच लोक आर्थिक अडचणीत आहेत. अशा अडचणीच्या काळात केंद्र सरकार रोज नव्याने इंधनाची दरवाढ करत आहे. या पार्श्वभूमीव राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.
'कोरोनामुळे रोजगार नाही'
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सामन्य जनतेला आज कुटुंब चालवणे कठीण झाले आहे. यामध्ये आवश्यक असलेल्या गरजाही पुर्ण होत नाहीत. सध्या सिलिंडरचे चारशे रुपयांवरून 800 रुपयांवर गेला आहे. आधीच कोरोनामुळे सामान्य जनतेच्या हातचा रोजगार हिरावला गेला आहे. आता या महागाईने जनता मोठी त्रस्त झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ कमी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येत आहे.