ETV Bharat / state

मनसे कार्यकर्ते झाले वाहतूक शिपाई; यवतमाळच्या प्रत्येक चौकात केले आंदोलन

यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा झाले आहेत. याबाबत मनसेने वारंवार तक्रारी दिल्या होत्या मात्र, वाहतूक विभागाने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता त्यांनी चौका-चौकात आंदोलन केले आहे.

Agitation
आंदोलन
author img

By

Published : Jan 17, 2021, 11:13 AM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील वणी शहरात उपविभागीय वाहतूक पोलीस कार्यालय अस्तित्वात असतानाही शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाला वारंवार निवेदने देऊन सुद्धा वाहतूक शिपायांची नेमणूक होत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी वाहतूक शिपायाची जबाबदारी पार पाडत वाहतूक सुरळीत केली.

यवतमाळच्या प्रत्येक चौकात मनसेने आंदोलन केले

खाण आणि कोल वॉशरीमुळे रहदारी -

वणी शहराच्या आसपासच्या परिसरात कोळसा खाणी आणि कोल वॉशरी असल्याने शहरातून चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. अनेकवेळा अज्ञात वाहनांच्या धडकेत नागरिक ठार झाल्याच्या घटनाही घडल्या आहे. अशातच चौकात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.

माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, अजित शेख, लक्की सोमकुवर, शिवा पेचे, शंकर पिंपळकर, मयूर घाटोळे, अरविंद राजूरकर, इरफान सिद्धीकी, रोषण शिंदे, अनिकेत येसेकर, अक्षय हेपट, राहूल गोटे या मनसे सैनिकांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळत आंदोलन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.