ETV Bharat / state

..तर मनसे स्टाईलने धडा शिकवू, स्थानिक बेरोजगारांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक

वणी विभागात मात्र, सामान्य माणसाच्या रोजगारावर मुजोर कंपनी धारकांकडून कुऱ्हाड चालवली जात आहे. स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीकडून डावलले जात आहे. त्यामुळे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याकडे स्थानिक बेरोजगार युवकांनी आपली व्यथा मांडून रोजगार मिळवून देण्याची मागणी केली.

mns agitation in Yavatmal
mns agitation in Yavatmal
author img

By

Published : Sep 3, 2021, 3:31 PM IST

Updated : Sep 3, 2021, 4:06 PM IST

यवतमाळ - बघावं तिकडे बेरोजगारीचा भस्मासूर वाढत चालला आहे. त्यातही कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा सामान्य माणूस अत्यंत समर्थपणे मुकाबला करत आहे. असे असताना वणी विभागात मात्र, सामान्य माणसाच्या रोजगारावर मुजोर कंपनी धारकांकडून कुऱ्हाड चालवली जात आहे. स्थानिक बेरोजगार युवकांना कंपनीकडून डावलले जात आहे. त्यामुळे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याकडे स्थानिक बेरोजगार युवकांनी आपली व्यथा मांडून रोजगार मिळवून देण्याची मागणी केली. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी थेट कंपनीमध्ये जाऊन गौरव कन्सट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकाला चांगलेच धारेवर धरले. आठ दिवसात स्थानिकांना न घेतल्यास मनसे स्टाईल न्याय मिळवून देण्याचा इशारा राजू उंबरकर यांनी दिला.

स्थानिक बेरोजगारांच्या रोजगारासाठी मनसे आक्रमक
स्थानिकांना जाणिवपूर्वक डावलल्याचा आरोप -
वणी विभागात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा साठा आहे. तितक्याच मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खननही चालू असते. मात्र हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला येथे काम मिळत नाही. सदरच्या कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना डावलून इतरत्र युवकांना काम दिले जात आहे आणि स्थानिकांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. असा स्थानिक बेरोजगारांचा आरोप आहे. हा प्रश्न वणी विभागात दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याकरिता राजू उंबरकर यांनी सदर कंपनीमध्ये धडक देऊन निवेदन दिले. येत्या आठ दिवसात स्थानिकांना सामावून न घेतल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडू, असा इशाराही दिला. यावेळी मनसेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, मारेगाव तालुका अध्यक्ष रमेश सोनुले, मनसेचे सरपंच शुभम भोयर, रामचंद्र बल्की, विठ्ठल गुरनुले, शिवराम बेर्डे , अंकुशपाचभाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व स्थानिक बेरोजगार युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Sep 3, 2021, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.