ETV Bharat / state

यवतमाळमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार; आरोपी गजाआड - यवतमाळमध्ये विवाहितेवर अत्याचार

मारेगाव तालुक्यात एका विवाहित महिलेला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

married woman Physically abused in Yavatmal
यवतमाळमध्ये विवाहित महिलेवर शारीरिक अत्याचार
author img

By

Published : Dec 20, 2019, 1:28 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यामधील मारेगाव तालुक्यात एका 26 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. गावातीलच एका तरुणाने अत्याचार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गणेश धनराज भोयर (24) असे या आरोपीचे नाव आहे.

यवतमाळमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार...

हेही वाचा... आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युवक विवाहितेच्या घरासमोर राहतो. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार युवक नेहमी महिलेसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे. परंतु मागील 15 दिवसापासून युवकाने महिलेला, आपण प्रेम करत असल्याचे सांगितले. मात्र, तिने त्याला याबाबत नकार दिला होता.

हेही वाचा.... नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यभर निदर्शने, सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांचा सहभाग

एके दिवशी महिला आपल्या कामानिमित्त पतीसोबत मारेगावला आली होती. यावेळी महिलेला सोडून पती घरी माघारी परतल्यावर युवकाने तिचा रस्ता अडवला. आपल्याला काहीतरी बोलायचे आहे, असे तिला सांगितले. आपल्या सोबत न बोलल्यास जीव देण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिला आपल्या गाडीवर बसवून एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केले. ही महिला जेव्हा घरी आली, तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला. तसेच मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन्स ट्रॅक करून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहेत.

हेही वाचा.... VIDEO: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधीपक्षाला टोलेबाजी...

Intro:Body:यवतमाळ: मारेगाव तालुक्यातील मांगरूळ
येथील महिलेस निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई मारेगाव पोलिस ठाण्यांतर्गत करण्यात आली.
मांगरूळ येथील 26 वर्षीय विवाहितेवर गावातीलच गणेश धनराज भोयर (24) या युवकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. युवक हा मांगरूळ येथीलच असून तो या विवाहितेच्या घरासमोर राहतो. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हा युवक नेहमी या महिलेसोबत बोलायचा. परंतु मागील 15 दिवसापासून हा युवक या महिलेला मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत राहायचा. बचत गटाची सभा असल्याने ही महिला पतीसोबत मारेगावला आली होती. तिला बदकी भवन जवळ पोहचवून देऊन पती परत गेला. लगेचच हा युवक येऊन महिलेला मला तू माझ्याशी बोलली नाही तर मी जीवाचे काही करीन अशी धमकी देऊन जबरदस्तीने गाडीवर बसून वनीकडे घेऊन गेला. वणी-वरोरा बायपासजवळ या महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. या महिलेणे पतीला घडलेली आपबिती घरी आल्यानंतर सांगितली. महिलेने व पतीने मारेगाव पोलिस ठाने गाठून तक्रार दाखल केली. आरोपीच्या मोबाईल लोकेशन्स ट्रेस करून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली. आरोपीच्या विरोधात भादवी 376 (1) 363 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहेत.

बाईट - अमोल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.