यवतमाळ - तालुक्यातील हिवरा मजरा शिवारात रेती तस्करी होत आहे. अशी गुप्त माहिती मारेगाव पोलीस व महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर जप्त केले. तसेच 12 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एकून 11 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रात्रीच्या सुमारास तस्करी-
तालुक्यातील बंद असलेल्या रेती घाटावरुन अवैधपणे रेती तस्करी सुरू होती. दरम्यान, मारेगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री 2 वाजता चार रेती भरलेले ट्रॅक्टर, 4 ब्रास रेती जप्त केली. तसेच 12 आरोपींना 11 लाख 80 हजाराच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.
12 आरोपीना अटक -
रेती तस्करी करताना सचिन कवडू खिरटकर (रा.दहेगाव ता. वरोरा), सुधीर हनुमान टोंगे (रा. मोहबाळा ता. वरोरा), प्रसाद सुधाकर ढवस (रा. कानडा ता. मारेगाव), विनोद माधव चाहानकर (रा. रामेश्वर ता. मारेगांव), सुरज पंढरी ढेंगळे, (रा.मोहबाळा ता.वरोरा), विष्णु मोहन कडूकर, (रा. दहेगाव ता. वरोरा) , सुमित विनोद कोवे (रा. निमसाळा ता.वरोरा), विकास किसन वाघाडे (रा. कानडा ता. मारेगाव), अंकुश अरुन महारतळे (रा. सिंदी ता. मारेगाव), शामल मारोती उरकुडे , (रा. रामेश्वर ता. मारेगांव), सुरज भास्कर गजबे, (रा. रामेश्वर ता. मारेगाव), बंडु नामदेव झाडे (रा. सिंदी ता. मारेगांव) यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच आरोपींना मारेगाव न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मागदर्शनात जमादार सुरेंद्र टोंगे, जमादार कलीमभाई, जमादार गणेश सुंकुरवार, रमेश ताजने, अजय वाभिटकर यांनी कारवाई केली. कारवाई दरम्यान, महसूल विभागाचे एक पथक कोसारा रेती घाटाकडे होते. तर मारेगाव पोलिसांचे एक पथक हिवरा मजरा शिवारात होते.
हेही वाचा- "भाजपाला मुंबईवर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचाय"