यवतमाळ : यावेळी प्रमुख वक्ते बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री कालीचरणजी महाराज आणि धर्मगुरू परमपूज्य श्री बाबू सिंग महाराज यांच्या उपस्थितीत होते. यावेळी भव्य रॅली काढण्यात आली. तर यशवंत रंग क्रीडा मंदिर येथे जाहीर सभेचे रूपांतर होणार आहे.
लव्ह जिहाद, धर्मांतर कायदा लागू करण्याची मागणी - महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्म परिवर्तन कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांनी 21 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. हिंदु जागृती समितीच्या वतीने नागपूर विधान भवनासमोर आंदोलन केले होते. यासाठी यशवंत स्टेडियम ते नागपूर विधानभवन असा मोर्चा काढण्यात आला होता. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद, धर्मांतर कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी हिंदू संघटनांची मागणी आहे. सध्या नागपुरात विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे.
महाराष्ट्र लव्ह जिहाद कायदा लागू करण्यास तयार - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली होती की, महाराष्ट्र लव्ह जिहाद कायदा लागू करण्यास तयार आहे. त्यासाठी इतर राज्यात लागू असलेल्या या कायद्याचा अभ्यास केला जात आहे. याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, राज्य विधानसभेत असा कायदा आणण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याबाबत आम्ही सर्व पैलूंचा अभ्यास करत आहोत. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात दावा केला आहे की, लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकार येत्या काही दिवसांत कायदा आणणार आहे.
लव्ह जिहाद म्हणजे काय? जेव्हा एखाद्या विशिष्ट धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्मातील मुलींना अडकवून त्यांचे धर्मांतर करतात. तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेला लव्ह जिहाद म्हणतात. या शब्दाला पूर्वी कायदेशीर मान्यता नव्हती. लव्ह जिहाद खरोखर खरे असल्याचे हिंदू संघटनाचे म्हणणे आहे. ज्यामध्ये मुस्लिम तरुण लव्ह जिहादमध्ये अडकतात हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करतात.
अखिलाचा विवाह रद्द - केरळमधून हिंदू महिला अखिला अशोकनचे प्रकरण समोर आले आहे. केरळ उच्च न्यायालयाने 25 मे रोजी अखिलाचा विवाह रद्द केला होता. डिसेंबर 2016 मध्ये तिने एका मुस्लिम पुरुषाशी लग्न केले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा केरळसह देशातील अनेक राज्यांमध्ये अशा अनेक प्रकरणांची चौकशी करत आहे.
बिशपच्या अहवालात मोठा खुलासा - 2009 मध्ये केरळ कॅथॉलिक बिशप्स कौन्सिलच्या लव्ह जिहादच्या अहवालाने सर्वांनाच धक्का दिला होता. ज्यामध्ये केरळमधील 4 हजार 500 मुलींना 'लव्ह जिहाद' अंतर्गत टार्गेट करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. एकट्या कर्नाटकात 30 हजार मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीने केला आहे.
25 जून 2012 रोजी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी विधानसभेत सांगितले की 2006 पासून राज्यात 2 हजार 667 महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्यापैकी 2 हजार 195 हिंदू तर 492 ख्रिश्चन होते. मात्र, राज्यात सक्तीच्या धर्मांतराचा कोणताही पुरावा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.