ETV Bharat / state

यवतमाळमधील हॉटेलमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद - १० वर्षीय मुलीचा विनयभंग यवतमाळ

पीडित मुलगी आपल्या आईवडिलांसोबत हॉटेलमधील लग्नसमारंभात आली होती. यावेळी या नराधमाने तिला खाऊचे आमिष दाखवून एकांतात नेले. त्यानंतर मुलगी घाबरली असता, तिला जबरदस्तीने उचलून नेले. तिचा विनयभंग केला. त्यानंतर मुलगी पळत सुटली आणि तिने हा सर्व प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला.

man molested girl in hotel yavatmal
हॉटेलमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Feb 27, 2020, 11:36 AM IST

Updated : Feb 27, 2020, 12:32 PM IST

यवतमाळ - शहरातील दारव्हा रोडवरील एका हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्याने १० वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. ही मुलगी आपल्या आईवडिलांसोबत लग्नसमारंभासाठी आली असता, हा प्रकार घडला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

यवतमाळमधील हॉटेलमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

अक्षय चांदेकर, असे नराधमाचे नाव आहे. तो गेल्या काही दिवसांपासून हॉटेलमध्ये साफ-सफाईचे काम करतो. पीडित मुलगी आपल्या आईवडिलांसोबत हॉटेलमधील लग्नसमारंभात आली होती. यावेळी या नराधमाने तिला खाऊचे आमिष दाखवून एकांतात नेले. त्यानंतर मुलगी घाबरली असता, तिला जबरदस्तीने उचलून नेत तिचा विनयभंग केला. त्यानंतर मुलगी पळत सुटली आणि तिने हा सर्व प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला.

यवतमाळमधील हॉटेलमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग

पीडितेच्या पालकांनी तत्काळ पोलिसांना बोलावून नराधमाला त्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

Last Updated : Feb 27, 2020, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.