यवतमाळ - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुसद तालुक्यातील गहूली येथील समाधी स्थळावर वीज कोसळली आहे. त्यामुळे समाधीस्थळाला क्षती पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातू तथा भाजपाचे आमदार निलय नाईक आणि तहसीलदार अशोक गीते यांनी समधीस्थळाला भेट देऊन पाहणी केली.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
गुरुवारी रात्री पुसद, गहुली परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. गहूली येथील समधीस्थळावर वीज पडल्याने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व राजुसिंग नाईक यांच्या समाधीस्थळाला हानी पोहोचली. समाधीस्थळाच्या छताचे व भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नातू तथा भाजपा आमदार निलय नाईक यांच्यासह तहसीलदार पुसद यांनी समाधीस्थळाची पाहणी केली.