यवतमाळ : पुसद वनविभाग अंतर्गत (Under Pusad Forest Department ) येत असलेल्या खंडाळा बीटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी प्रात:विधीसाठी गेलेल्या युवतीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला ( Wadgaon Leopard attacks young woman ) केला. या हल्ल्यात युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. शितल नागोराव शिंदे (रा.वडगाव, ता. पुसद) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली. त्यामुळे सध्या गावात दहशतीची वातावरण आहे.
या घटनेमुळे वडगाव गाव परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी शेतात जाण्यासाठी सुद्धा घाबरत आहेत. पुसद वनविभाच्या खंडाळा बिटमधील वडगाव शिवारात आज सकाळी सहा वाजता तरुणीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. पहाटे गावातील शितल शिंदे ही प्रात:विधीसाठी गावाबाहेर जंगल परिसरात गेली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक युवतीवर हल्ला केला. त्याने युवतीच्या गळ्याला पकडून काही दूर जंगलात फरफट नेले. जीव वाचविण्यासाठी तिने आरडाओरडा केला. हा आरडाओरडा ऐकून शेतात रात्री पिकांची राखण करायला गेलेल्या शेतकऱ्यांनी तिला वाचविण्यासाठी जंगलात धाव घेतली.
हेही वाचा - Yavatmal Girl Missing : तीन वर्षीय चिमुकली चार दिवसापासून बेपत्ता, श्वान पथक बोलावले, एलसीबीच्या पथकाकडूनही शोध सुरु
त्यानंतर बिबट्याने घटनास्थळा वरून धूम ठोकली. मात्र या घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पुसद वनविभागाला व खंडाळा पोलीस स्टेशनला दिली. वनकरक्षक आणि त्यांच्या पथकाने ( Pusad Forest Department ) घटनास्थळाला भेट देत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घडलेल्या घटनेमुळे गावात दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने त्याला पकडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन
Leopard Attacks Wadgaon : पुसद तालुक्यात युवतीवर बिबट्याचा हल्ला
पुसद तालुक्यातील वडगाव ( Leopard Attacks Wadgaon Young Woman ) येथे बिबट्याने युवतीवर प्राणघातक हल्ला ( Leopard attacks young woman in Wadgaon ) केल्याची घटना घडली आहे. या हल्यात युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात भितीचे वातावरण पसरले. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.