यवतमाळ - कोरोनाच्या या संकटात अनेक कामे ठप्प झाली होती. मजुरांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या ग्रामीण भागातील घरकुलांची कामे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आता या आदेशाने येथील काही मजूरांना थोड्या प्रमाणात आधार मिळाला आहे.
जिल्ह्यात बांधकाम मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यापासून कामे ठप्प होती. यामुळे अनेक कामगार, मजूर कामाच्या प्रतिक्षेत होते. लॉकडाऊनमध्ये सर्व काम धंदे बंद झाली होती. अशा परिस्थितीत काही सामाजिक संस्था आणि शासनाने धान्य स्वरूपात या मजुरांना मदत केली होती. ते धान्य संपल्यावर पुन्हा काम बंद राहिल्यास जीवन कसे जगायचे? असा प्रश्न निर्माण झाला होता.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी ग्रामीण भागात काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचा फायदा मजुरांना झाला असल्यामुळे गावातच मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. घरकुल, शौचालय, विहीर आणि इतर बांधकाम सुरू झाल्याने मजूर त्या कामावर जात आहेत.
हेही वाचा - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये होते उपस्थित
कोरोनावर मात करण्यासाठी मास्क,सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन करीत आहेत. तर ही काळजी बांधकाम मजूर घेताना दिसत आहेत.