यवतमाळ - जलजीवन मिशनअंतर्गत मार्च 2024 पर्यंत देशातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रतिदिन प्रतिव्यक्ती 40 लिटर ऐवजी 55 लिटर गुणवत्तापूर्वक पाणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जलजीवन मिशनच्या 527.80 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे.
प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
जलजीवन मिशनच्या 527.80 कोटीच्या आराखड्यामध्ये प्रपत्र 'अ' नुसार 687 गावांसाठी 49.67 कोटी रुपये, प्रपत्र 'ब' नुसार 311 गावांसाठी 309.01 कोटी, प्रपत्र 'क' नुसार 543 गावांसाठी 120.52 कोटी आणि 162 गावात नवीन योजनांसाठी 48.60 कोटी रुपयांच्या आराखड्याचा समावेश आहे. केवळ योजना सुरू करणे यावर समाधान न मानता त्याची प्रभावी अंमलबजावणी दिसली पाहिजे.
यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रतिदिन प्रतिव्यक्ती 40 लिटर ऐवजी 55 लिटर गुणवत्तापूर्वक पाणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जलजीवन मिशनच्या 527.80 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी दिली आहे. जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी पाणी पुरवठा योजना योग्य पध्दतीने कार्यान्वित झाल्या पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.