यवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात 6474 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 1032 जण पॉझिटिव्ह आणि 895 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच एकूण 36 मृत्यूची नोंद झाली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21, खाजगी कोविड रुग्णालयात 11 आणि डीसीएचसीमध्ये चार मृत्यू झाले. मृत्यू झालेल्यांपौकी एक व्यक्ती बाहेरील जिल्ह्यातील आहे.
मृत्युदर 2.38
आज 7506 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1032 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 6474 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7306 रुग्ण ॲक्टीव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2711, तर गृह विलगीकरणात 4595 इतके रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या 62837 इतकी झाली आहे. 24 तासात 895 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 54037 एवढी आहे. तर जिल्ह्यात एकूण 1494 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझीटीव्हीटी दर 13.15, तर मृत्यूदर 2.38 आहे.
1840 नमुने अप्राप्त
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या 1032 जणांमध्ये 634 पुरुष आणि 398 महिला आहेत. यात वणी येथील 166 पॉझिटिव्ह रुग्ण, यवतमाळ 159, पांढरकवडा 125, दारव्हा 105, दिग्रस 86, मारेगाव 69, पुसद 67, नेर 56, राळेगाव 56, बाभुळगाव 36, कळंब 31, महागाव 28, आर्णि 16, उमरखेड 13, घाटंजी 8 आणि इतर शहरातील 14 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 477913 नमुने पाठविले असून यापैकी 476073 प्राप्त तर 1840 अप्राप्त आहेत. तसेच 413236 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
रुग्णालयात 733 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सहा डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि 29 खाजगी कोविड हॉस्पीटलमध्ये एकूण 733 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 428 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 149 बेड शिल्लक, सहा डीसीएचसीमध्ये एकूण 360 बेडपैकी 136 रुग्णांसाठी उपयोगात, 224 बेड शिल्लक आणि 29 खाजगी कोविड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 704 इतके उपयोगात तर 360 बेड शिल्लक आहेत.
हेही वाचा - डॉक्टरांच्या सुट्टीसाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचमधील कोरोना रुग्णांना सक्तीचे 'प्रस्थान'