यवतमाळ - पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत खंडाळा घाटात तवेरा गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात तिघाजणांचा जागिचा मृत्यू झाला आहे. तर, दोघेजण गंभीर आहेत. जखमींवर पुसद येथे उपचार सुरू आहेत. सर्वजण मध्यप्रदेश येथील असून वाशिम मार्गे पुसद येथे मुलगी बघण्यासाठी आले होते.
तिघेजण जागीच ठार झाले
मध्यप्रदेश पासींग चार चाकी गाडी (एमपी ०९ बिसी९५८९) खंडाळा घाटात आली असताना अचानक चालकाच्या पायाखाली बिसलेरी बॉटल आल्याने ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मेन रस्त्यापासून ही गाडी जवळपास ७० ते ८० फुट दूर जाऊन सागवान वृक्षवर अदळुन भिषण अपघात झाला. त्यामध्ये तिघेजण जागीच ठार झाले आहेत. तर, दोघेजण गंभीर असून त्यांना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात अशोक केंद्रे ( ४५, रा. आंबासे जि. हरदा), आनंत पाटील (४५ रा.कालकोंड जि, खंडवा, अरविंद बाके (२५ रा.निसानिया जि, खंडवा) अशी मृतांची नावे आहेत. तसेच, गंभीर जखमींमध्ये रामशंकर निर्भयदेव खोर (३5, रा. कालकोंडा जि. हरदा) तर सिंग राजपूत (६५ रा.अवलीया जि.खंडवा) हे दुर्घटनाग्रस्त मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर, सदर घटनेचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.