ETV Bharat / state

अडीच कोटींची कामे केली पन्नास लाखात; गावकऱ्यांची भ्रष्टाचार झाल्याची तक्रार - Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme

ईचोरा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गावामध्ये अनेक विकासात्मक कामे हातात घेण्यात आली होती. मात्र, या कामात भ्रष्टाचार झाला असून, ही सर्व कामे पन्नास लाखातच आटोपण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

अडीच कोटींची कामे केली पन्नास लाखात
अडीच कोटींची कामे केली पन्नास लाखात
author img

By

Published : Jun 13, 2021, 2:27 PM IST

यवतमाळ - आर्णी तालुक्यातील इचोरा हे तीन हजार लोकवस्तीचे गाव. या गावात नाली बांधकाम, संरक्षण भिंत आणि पुलाचे असे जवळपास अडीच कोटीचे कामे करण्यात आले आहे. मात्र, या कामात भ्रष्टाचार झाला असून ही सर्व कामे पन्नास लाखातच आटोपण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संबंधीची तक्रार गावातील प्रा.अजय राठोड यांनी ग्रामसेवकापासून तर मंत्रालयापर्यंत केली आहे. मात्र, याची कुठलीच दखल घेण्यात आली नसल्याने, ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

अडीच कोटींची कामे केली पन्नास लाखात

रोजगार हमीतून झाली कामे

ईचोरा ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गावामध्ये अनेक विकासात्मक कामे हातात घेण्यात आली. यात वृक्ष लागवड, उघडी गटार, पूर संरक्षण भिंत बांधकाम असे जवळपास अडीच कोटींची कामे गेल्या एक वर्षापासून या गावात सुरू आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून संबंधित ठेकेदारांनी ही सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली आहे. पूर संरक्षण भिंतीमध्ये मोठ्या दगडांचा वापर, तर नाल्यामध्ये निकृष्ट साहित्य वापरले आहे, तर पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. अशी सर्वे कामे ठरलेल्या किंमतीनुसार न झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

ग्रामसेवकपासून तर मंत्रालयापर्यंत तक्रारी

गावात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी, इतकेच नव्हे तर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार या पोर्टल वरही करण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक प्रशासनातील अधिकारी यांनी अद्याप याची दखल घेतली नसून, कामाची पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत असल्याचाही आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला.

हेही वाचा - अन् शिवसेना आमदाराने कंत्राटदारालाच बसवलं नाल्यात; कचऱ्याने घातली अंघोळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.