यवतमाळ - शहरातील उचभ्रू असलेल्या शिवाजी नगरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मेघना रविराज चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे.
पती रविराज रमेश चौधरीने नातेवाईकांकडे मुक्कामी आले असता पत्नीचा गळा आवळून व चाकूने वार करत खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी पती रविराज याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.