ETV Bharat / state

भाजपने मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नयेत; गृहमंत्री देशमुखांचा टोला

नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री असतानाही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे भाजपने आता मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये, झालेल्या पराभवाचे चिंतन, मंथन करावे असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

home minister anil deshmukh
गृहमंत्री देशमुखांचा टोला
author img

By

Published : Jan 22, 2021, 7:40 AM IST

यवतमाळ - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. तर नागपूर विधानपरिषदेच्या 58 वर्षापासून असलेल्या भाजपच्या पदवीधर मतदारसंघाचे निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळविले. नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री असतानाही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे भाजपने आता मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये, झालेल्या पराभवाचे चिंतन, मंथन करावे असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

भाजपने मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नयेत;
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने ताकद मिळेल2013-14 मध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन केले. त्यावेळी संपूर्ण देश आंदोलनात उतरल्याचे आपण बघितले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यावर केंद्र सरकारने ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, केंद्राने ताठर भूमिका घेतली या आंदोलनात आता अण्णा हजारे उतरल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्कीच ताकद मिळेल, अशी अपेक्षा गृहमंत्री देशमुख यांनी व्यक्त केली.जेलमधील घटनेची चौकशी करूनागपूर येथील कारागृहामध्ये ड्रग्स पूरविण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार गंभीर असून नागपूर येथील कारागृह असोत की येरवडा, मुंबईतील कारागृह असोत अश्या गोष्टी जर कारागृहात घडत असेल तर या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चितच कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.कोरोनाच्या काळातील शहीद पोलिसांना मदतकोरोना विरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून काम केले. अशातच राज्यातील 330 पोलीस शहीद झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दोन पोलीस शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देशमुख यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.