यवतमाळ- सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. आज (सोमवारी) रात्री आठ वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
हेही वाचा- महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ
जिल्ह्यातील पुसद, राळेगाव, उमरखेड या तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तर महागाव तालुक्यातील हिवरी, धनोडा, उटी, वाकोडी, दहीसावली तीवरंग पोहनडूल या गावांना पावसाने पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील काही तालुक्यात कुठे तूरळक तर कुठे जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांना चांगलाच फटका बसला आहे.