यवतमाळ - घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहान मुलांना पोलिओचा डोज म्हणून सॅनिटायझर पाजल्याची धक्कादायक घटना घडली होती. या सर्व बालकांना 31 जानेवारीला रात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सर्व बालकांना 48 तास देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आज त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
हेही वाचा - भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, मनसेची मागणी
मुलांची प्रकृती उत्तम असल्याचे मुलांच्या पालकांनी सांगितले असून, मुलांसह पालक कापशी (कोपरी) या गावाकडे रवाना झाले. या प्रकरणी तिघांना बडतर्फ करण्यात आले असून केंद्रावरील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. तर, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्याने चौकशीत काय निष्पन्न होईल, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - कृषी अॅप: एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती