यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड आपल्या पुतण्याच्या विवाहात चित्रपटातील गाण्यावर चांगलेच थिरकले. त्यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
पुतण्याच्या विवाहात पत्नीसह नृत्य करण्याचा योग -
पालकमंत्री संजय राठोड नेहमीच नागरिकांच्या गराड्यात असतात. कुटुंबातील व्यक्तीला वेळ देणे त्यांना जमत नाही. मात्र, पुतण्याच्या विवाहात पत्नीसह नृत्य करण्याचा योग जुळून आला. किसीं दिन बनुगी मै राजा की राणी, या गीताच्या तालावर त्यांनी पत्नी शीतलसह थिरकले. त्यांच्या या नृत्याचा व्हिडीओला फेसबूक, इंस्टाग्रास सारख्या सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनीही केले होते नृत्य -
पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांचा बार उडणार आहे. राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे. यातच ममता यांनी आपल्या राजकीय धावपळीतून वेळ काढत बुधवारी कोलकात्यामध्ये आयोजित एका बंगला संगीत कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमामध्ये ममता बॅनर्जी यांनी कलाकारांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी स्टेजवरच कलाकारांसोबत ठेका धरला. त्यांच एक वेगळ रूप कार्यक्रमात पाहायला मिळाले.
हेही वाचा - इथियोपियाची गृहयुद्धाच्या दिशेने वाटचाल.. देश अधोगतीच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता