ETV Bharat / state

यवतमाळ : कडक निर्बंध लावा; मात्र, लॉकडाऊन नको - नागरिकांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यात दररोज 200च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. तसेच रोज दोन-तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हा पर्याय नसून शासनाने वेळोवेळी कडक नियम व संचारबंदीही लागू केली आहे.

yawatmal corona
यवतमाळ कोरोना
author img

By

Published : Feb 27, 2021, 4:16 PM IST

Updated : Feb 27, 2021, 4:46 PM IST

यवतमाळ - मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. यादरम्यान रोजंदारी करणारे, लहान-मोठे व्यावसायिक, मजूर वर्ग यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनही कमी करण्यात आले. यानंतर आता कुठे जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे लघु व्यावसायिक, रोजंदारी करणारे मजूर यांनी शासनाने पुन्हा कडक निर्बंध लावावेत. मात्र, लॉकडाऊन करू नये, अशी मागणी केली आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा.

कोरोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी -

यवतमाळ जिल्ह्यात दररोज 200च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. तसेच रोज दोन-तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हा पर्याय नसून शासनाने वेळोवेळी कडक नियम व संचारबंदीही लागू केली आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी शासकीय यंत्रणेकडून योग्य होत नसल्याने नागरिक बिनधास्तपणे गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांवर आणि जे व्यावसायिक आपल्या प्रतिष्ठानमध्ये नियमाची अंमलबजावणी करीत नाहीत त्यांच्यावर कारवाई केल्यास वाढणारी रुग्ण संख्या कमी होऊ शकते.

हेही वाचा - यवतमाळमध्ये चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप

अनेकांवर येऊ शकते उपासमारीची वेळ -

मागील 11 महिन्यात नागरिकांनी लॉकडाऊनची परिस्थिती अनुभवली आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेले. तर रस्त्याच्या कडेला उपजीविकेसाठी व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन लावणे म्हणजे नागरिकांवर मोठे संकटच येणार आहेत. या परिस्थितीवर शासनाने कडक निर्बंध लावावेत. मात्र, लॉकडाऊन नको, अशी मागणी होत आहे.

Last Updated : Feb 27, 2021, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.