यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील शेंबाळपिंपरी विद्युत वितरण केंद्राअंतर्गत येणाऱ्या शेंबाळपिंपरी या गावात वीज वसुली मोहिम राबवत आहेत. अशात तंत्रज्ञ दत्तात्रय शामसुंदर, कर्मचारी विनोद चव्हाण, मिलींद वाघमारे व गौतम मेश्राम यांच्यावर चौघांनी मिळून हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - बँक कर्मचारी संघटनांच्या संपांने देशामध्ये बँकांचे कामकाज विस्कळित
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
दत्तात्रय शामसुंदर हे वीज वसुली मोहिम राबवित असताना आरोपी अरुण पेंदे, गोपाळ पेंदे, सागर पेंदे व राजु पेंदे यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर शेंबाळपिंपरी येथील कार्यरत कर्मचारी विनोद चव्हाण, तंत्रज्ञ मिलिंद वाघमारे, वरिष्ठ तंत्रज्ञ, वरीष्ठ तंत्रज्ञ गौतम मेश्राम हे चौघे महावितरण कंपनीचे थकीत वीज बिल वसुली करीता शेंबाळपिंपरी येथे ग्राहकांची वीज बिल वसुली व ज्याची वीज बिल भरण्यास असमर्थता दाखविली त्याची वीज बिल भरेपावेतो विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होतेे. अरुण पेंदे यांचे नावाने असलेले ग्राहक क्र. ३८६४३१३९२७१८ यांच्याकडे थकबाकी असल्याने त्यांच्या दुकानात जाऊन त्यास दुकानातील बिल भरणेबाबत विनंती केली असता त्यांनी बिल भरत नाही तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे सांगितले. या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित केला.
हेही वाचा - वाझे प्रकरणात शिवसेना युवानेत्याचे नाव; कोण आहेत वरूण सरदेसाई?
वितरणाच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
कर्मचारी हिंगोली रोडकडे जात असतांना चारही आरोपींनी कर्मचारी यांची दुचाकी अडवुन तुम्ही आमचे दुकानचा विद्युत पुरवठा खंडित का केला. तुमच्या सहकाऱ्याला मारल्याशिवाय राहणार नाही व तुम्हाला येथुन जाऊ देणार नाही, असे म्हणून वाद घातला. सहकाऱ्याने त्यांना थकीत वीज बिल भरुन द्या, आम्ही विद्युत पुरवठा चालू करुन देतो. असे म्हणताच त्यांनी आम्ही वीज बिल भरत नाही असे म्हणून शामसुंदर यांची मोटारसायकल खाली पाडून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी सहकाऱ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सुद्धा मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.