यवतमाळ- जिल्ह्यात 40 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. पुसद शहरातील श्रीरामपूर येथील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले 8 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 25 पुरुष व 15 महिला आहेत. दिग्रस येथील पाच पुरुष व तीन महिला, पुसद येथील पार्वतीनगरातील एक महिला, पुसद येथील तीन पुरुष व एक महिला, वणी येथील एक पुरूष, पांढरवकडा येथील अकरा पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील साईनाथ लेआऊट येथील एक पुरुष, यवतमाळ येथील दोन पुरुष व तीन महिला, दारव्हा येथील एक पुरुष व पाच महिला, तर आर्णी येथील एक पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात बुधवारपर्यंत 187 ॲक्टिव्ह रुग्ण होते. 40 जणांची भर पडल्याने हा आकडा 227 वर पोहोचला. कोरोनामुक्त झालेल्या 8 जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 219 झाली आहे. यामध्ये विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 144 तर रॅपिड ॲटिंजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले 75 जण आहेत.
जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 689 झाली आहे. यापैकी 448 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.