ETV Bharat / state

बारा बलुतेदारांच्या मागण्यांसाठी 5 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा - मराठा आरक्षण प्रश्न

बारा बलुतेदारांच्या विविध मागण्यासाठी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसेचे वर्गीकरण केल्यास निकाली निघू शकतो, असे मतही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले.

haribau rathor
आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यां
author img

By

Published : Dec 31, 2020, 11:51 AM IST

यवतमाळ - वंचित समाजातील बारा बलुतेदारांच्या विविध मागण्यासाठी पाच जानेवारीला मुंबई येथील आझाद मैदानावर देशव्यापी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार तथा आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

वंचितांच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेन

वंचित समाजातील बारा बलुतेदार पारधी, गोवारी, भटके-विमुक्त, बेरोजगार, बचत गट, शेतकरी-शेतमजूर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, विशेष मागास वर्ग, अल्पसंख्यांक यांच्या अल्पसंख्यांक यांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी अद्यापही प्रलंबित आहे. शासनाकडे विविध पद्धतीने मागण्या, मोर्चे, निवेदने देण्यात आले. मात्र याची कुठलीच दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळेच या मोर्चाचे आयोजन मुंबईतील आझाद मैदानावर करण्यात आले आहे. वंचितांच्या हक्कासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचेही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न रेंगाळणार -

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. 25 जानेवारीला त्यावरची पुढील सुनावणी होणार आहे. मात्र, मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न रेंगाळणार असल्याचे मत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता संविधानानुसार आरक्षण देता येईल, असा प्रस्ताव माजी खासदार राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या इडब्लू आरक्षणामुळे मराठा समाजाकडून विरोध होत आहे. आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे आणि पुन्हा रेंगाळणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचे सब कॅटेगिरीशन केल्यास हा प्रश्न निकाली निघू शकतो, अशाप्रकारे सर्वांना यात सहभागी करून घेता येणार असल्याचेही राठोड यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.