यवतमाळ - अर्णी मार्गावर पल्लवी लॉनसमोर पूर्व वैमनस्यातून शस्त्राने वार करून दुहेरी हत्याकांडाची घटना घटना मंगळवारी (दि. 12) रात्री साडेअकरा वाजता सुमारास घडली होती. वसीम पठाण दिलावर पठाण (वय 36 वर्षे, रा. नेताजीनगर), उमेश तुळशीराम येरमे (वय 34 वर्षे, रा. नेताजीनगर), अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी आरोपी नीरज वाघमारे (वय 34 वर्षे, रा. मधुबन सोसायटी, धामणगाव रोड), छोटे खान अन्वर खान पठाण (वय 54 वर्षे), शेख रहेमान शेख जब्बार (वय 27 वर्षे, दोघेही रा. नेताजीनगर), नितीन बाबाराव पवार (वय 25 वर्षे, रा. वडगाव) यांच्यासह एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी पहाटे अटक करण्यात आली.
याबाबत मृत वसीमची पत्नी निखत पठाणच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात शेख रहेमान, वसीम पठाण, उमेश येरमे, नीलेश उईके, नितीन पवार व अल्पवयीन बालक, अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम पठाण याचा काही दिवसांपूर्वी नीरज वाघमारेच्या कार्यालयासमोर शेख रहेमान यांच्यासोबत भांडण झाले होते. यावेळी नीरज वाघमारेने वसीमला समजावून सांग नाही तर त्याचा काटा काढतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर 15 दिवसांनी वसीम पठाण याने छोटे खान याच्याशी वाद घातला. तेव्हाही छोटे खान याने वसीमला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नीरज व छोटे खान यांनी कट रचून शेख रहेमानच्या हाताने हे हत्याकांड घडवून आणले, असे तक्रारीत म्हटले आहे.
भांडण मिटवण्यासाठी बोलवले आणि केला घात
घटनेच्या रात्री वसीम पठाण याला फोन करून भांडण मिटविण्यासाठी बोलावण्यात आले होते. शेख रहेमान, वसीम पठाण, उमेश येरमे, नीलेश उईके, नितीन पवार व अल्पवयीन बालक हे सहा जण आर्णी मार्गावरील एका बारमध्ये दारू प्यायले. नंतर जेवण करण्यासाठी आर्णी मार्गावरील एका ढाब्यावर गेले. जेवतानाच वसीम व रहेमानमध्ये वाद झाला. नंतर उमेश येरमे हा चालत वनवासी मारोती परिसरात आला. उमेशला शोधण्यासाठी वसीम व रहेमान एकाच दुचाकीवरून आले. पल्लवी लॉनसमोर रहेमान आणि उमेश यांच्यामध्ये झटापट झाली. तेवढ्यात मागून रहेमानचे तीन साथीदार दुचाकीने पोहोचले. लोखंडी रॉडने उमेशवर हल्ला चढवला. घटनास्थळवरून वसीमने पळ काढला तर पाठलागकरून त्याच्यावरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. आरोपींना नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) येथील खंडाळा या गावातून तर नीरज वाघमारे व छोटे खान या दोघांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली.
हेही वाचा - शरीर सुखाची मागणी करत पतीने केली पत्नीचा हत्या