यवतमाळ- खासदार भावना गवळी यांच्या विजयाचा जल्लोष करताना फटाके फोडण्यात आले यावेळी फटाक्यांची ठिणगी हवेत उडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या गादी कारखान्यानजीक लगत असलेल्या दुकानाला आग लागली.
पोलिसांना आगीचा लोट दिसताच पोलीस व नागरिकांनी ही आग विझवली. या दुकानात लागूनच लाठीवाला पेट्रोल पंप असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आल्याने मोठा अनर्थ टळला. पेट्रोल पंपवरील अग्नी विरोधी यंत्रणेने आग विझविण्यात आली. खासदार भावना गवळी यांच्या विजयाचा जल्लोष करताना ही घटना घडली असून पोलिसांनी वाढत्या तापमानामुळे अशा मिरवणूकांमध्ये फटाके फोडण्यास बंधी घातली आहे.