ETV Bharat / state

यवतमाळ : 47 हजाराच्यावर शेतकरी अद्यापही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत - यवतमाळ ताज्या बातम्या

मागील दीड वर्षात वन्यप्राण्यांचे हल्ले, यात झालेला मृत्यू, गंभीर जखमी, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान, पशुधनाची हानी झाली. वनविभाकडून शेतकऱ्यांना झालेल्या या नुकसानीपोटी आर्थिक मदत दिली जाते. या मदतीपोटी 47 हजार 997 शेतकरी दीड वर्षापासून 17 कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आस लावून बसले आहे.

yavatmal financial aid news
प्रशासनाच्या उदासिन धोरणाचा शेतकऱ्यांना फटका; गेल्या वर्षी जाहीर झालेली आर्थिक मदत अद्यापही मिळाली नाही
author img

By

Published : Jul 3, 2021, 9:03 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील शेतकरी कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळामुळे त्रस्त झाला आहे. कर्जबाजारीपणा तर जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला. यातच गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. याही परिस्थितीत शेतकरी कसाबसा उभा असताना वनविभागाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळणे दुरापास्त झाले आहे. मागील दीड वर्षात वन्यप्राण्यांचे हल्ले, यात झालेला मृत्यू, गंभीर जखमी, वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान, पशुधनाची हानी झाली. वनविभाकडून शेतकऱ्यांना झालेल्या या नुकसानीपोटी आर्थिक मदत दिली जाते. या मदतीपोटी 47 हजार 997 शेतकरी दीड वर्षापासून 17 कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आस लावून बसले आहे.

प्रतिक्रिया

महिन्याभरात मिळायला हवी मदत -

शेतकऱ्यांना ही आर्थिक मदतीची रक्कम एका महिन्यात संबंधित व्यक्ती किंवा शेतकरी पशुपालक किंवा त्याच्या नातलगांना देणे अपेक्षित आहे. मात्र, आज हजारो हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असतानाही त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम मागील दीड वर्षीत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 2020 मध्ये ही रक्कम साधारण 12 कोटी 65 लाख, तर जानेवारी ते जून 2021 पर्यंत साधारणपणे 5 कोटी रुपये विविध प्रकरणात शेतकऱ्यांना देणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी साधारण दीड वर्षात 17 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, ती रक्कम आजही प्रलंबित आहे.

दीड वर्षात 47997 प्रकरणे; 17 कोटी थकीत -

2020 मध्ये मनुष्यहानीचे 2 प्रकरण असून त्याचे 30 लक्ष, तर वन्यप्राणी यांच्याकडून झालेल्या हल्ल्यात मनुष्यजखमी झाल्याच्या 75 प्रकरणात 49 लाख 80 हजार रुपये प्रलंबित आहे. तर पीकहानीमध्ये 32 हजार 918 प्रकरणात 11 कोटी 66 लाख रुपये, तसेच पशुधनहानीच्या 466 प्रकरणात 78 लाख 83 हजार रुपये प्रलंबित आहे. अशाप्रकारे 12 कोटी 65 लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. जानेवारी 2021 ते जून 2021 पर्यंत मनुष्यहानीच्या 33 प्रकरणंमध्ये 13 लाख 18 हजार, तर पीकहानीच्या 14 हजार 857 प्रकरणंमध्ये 4 कोटी 24 लाख 71 हजार रुपये, तर पशुधनहानीच्या 112 प्रकरणात 16 लाख 39 हजार रुपये प्रलंबित आहे.

शेतकऱ्यांना वनविभागात घ्यावे लागतात हेलपाटे -

महागाव तालुक्यातील शेतकरी मनीष जाधव यांच्या शेतात सन 2020च्या रब्बी हंगामात त्यांनी गव्हाची लागवड केली होती. मात्र, रोही आणि रानडुक्करच्या कळपाने त्यांच्या पिकाचे मोठे नुकसान केले. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी पुसदच्या वनविभागात अर्ज केला. मात्र, या घटनेला वर्ष झाले तरी झालेल्या नुकसानची भरपाईची त्यांना अजून मिळाली नाही. तसेच महागाव तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी जयसिंग राठोड यांच्या शेतांत गेल्या वर्षी वन्य प्राण्याकडून तूर, कापूस या पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी जून 2020 मध्ये वन विभागाकडे नुकसान भरपाईबाबत अर्ज केला होता. मात्र, त्याची रक्कम अजून त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून शेतकरी आणि पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - 'कयामत से कयामत तक' म्हणणाऱ्या फिल्मी हिरोचा पहिला विवाह टिकला 16, तर दुसरा 15 वर्षे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.