ETV Bharat / state

कापूस ओला झाला अन् तुरीचा बहर गळून गेला... - यवतमाळ कापूस नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे शेतातील वेचणीला आलेला कापूस ओला झाला आहे. तुरीला आलेला बहर गळून जात आहे.

अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत
अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत
author img

By

Published : Jan 4, 2020, 10:31 AM IST

यवतमाळ - दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातून शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे शेतातील वेचणीला आलेला कापूस ओला झाला आहे. तुरीला आलेला बहर गळून जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत

हेही वाचा - शेतात येऊन पाहिलं; दुसऱ्या दिवशी कापूस, संत्रा काढायचं ठरवलं, पण गारपीट आली अन्...

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वेचणीवर आलेला कापूस शेतातच गळून पडला आहे. जो कापूस शेतकऱ्यांच्या हाती लागेल त्याची प्रत चांगली नसल्याने या कापसाला योग्य भावही मिळणार नाही. तुरीची फुले गळून पडल्याने उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

Intro:Body:यवतमाळ : दोन महिन्यापूर्वी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. यातून शेतकरी कसाबसा सावरत नाहीत तर पीक घरी येण्याच्या तोंडावर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील कापूस ओला झाला. तर तुरीचे फुले आणि बार गळून जात असल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून ढगाली वातावरण असून अवकाळी पाऊस पडत आहे. होत असलेल्या पावसामुळे शेतातील कापूस हा ओला होत आहे. त्यामुळे ऐन वेचणीवर आलेला कापूस गळून पडला आहे. आता जो काही कापूस शेतकऱयांच्या हाती लागेल त्याची प्रत चांगली नसल्याने या कापसाला योग्य भाव सुद्धा मिळत नाही. या पावसाने तुरीचे ही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने तुरीचे फुले गळून पडत आहेत. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहेत शेतकऱ्यांचा कापूस ओला झाल्याने त्याला मिळणारा दरही आता कमी होणार आहेत. तर तुरीचा बार गळत असून किडींचा प्रादुर्भाव वाढणार आहेत. त्यामुळे खरिपातील नगदी पीक असलेल्या कापूस व तूर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय.

बाईट- प्रकाश मेहेता, शेतकरी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.