ETV Bharat / state

सुनेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या, पतीच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल - नेच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याची आत्महत्या

यवतमाळमध्ये सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. साहेबराव दवणे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

yavatmal
yavatmal
author img

By

Published : Aug 21, 2021, 1:49 AM IST

यवतमाळ - सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून सासर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप येथे घडली. मृत्यूपूर्वी सासऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला. साहेबराव दवणे (वय 65 वर्षे, रा. पंचशीलनगर, लोहारा) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

मनोज केदारे, ठाणेदार, अवधूतवाडी पोलीस स्टेशन

सूनेविरूद्ध गुन्हा दाखल

घटनेनंतर साहेबराव यांचा मुलगा सुरज याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पत्नी संध्या सूरज दवणे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सून सासऱ्याला द्यायची अश्लील शिव्या, धमकी

'साहेबराव दवणे यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी 4 बचत गटांकडून कर्ज उचलले होते. सून घरात आली. तिने सासू-सासर्‍यांची सेवा करण्याऐवजी शुल्लक कारणावरून वाद घालण्यात सुरू केले. लग्नासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता आपल्या नवर्‍याने भरू नये, असा ती दबाव टाकत होती. आपल्या सासर्‍याला अश्लील शिवीगाळ करत होती. तुम्हाला जेलमध्ये टाकतो, अशीही धमकीती नेहमी देत होती. यामुळे मानसिक धक्का बसल्याने मृतक साहेबराव दवणे यांनी आत्महत्या केली', असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनीही याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचा - ठाण्यातील कार चालकाच्या हत्येचा 9 वर्षांनी निकाल, 4 आरोपींना जन्मठेप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.