ETV Bharat / state

दिग्रसमध्ये कापूस खरेदीस उशीर, संतप्त शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन - Krushi Utpanna Bazar Samiti digras

दिग्रस येथे तीन दिवसांपासून कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी चक्काजाम आंदोलन केले. यामुळे मुख्य चौकात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कापूस खरेदीस उशीर होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी केले चक्का जाम आंदोलन

author img

By

Published : Feb 25, 2020, 11:57 AM IST

Updated : Feb 25, 2020, 3:12 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील दिग्रस येथे कापूस विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी खरेदीस उशीर होत असल्याने संतापून चक्काजाम आंदोलन केले. प्रशासनाने शेतकऱ्यांची समजूत घातल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, तोपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कापूस खरेदीस उशीर होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी केले चक्का जाम आंदोलन

शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला होता. पण खरेदीचा वेग हा अत्यंत कमी होता. त्यामुळे शेतकरी आपले हातातले काम सोडून तब्बल ८ दिवसांपासून कापूस खरेदी होईल या आशेवर बसले होते. परंतु, प्रशासनामार्फत कोणतीही सुनावणी न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतारून ३ तास चक्काजाम केला. यामुळे मुख्य चौकात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवागार 'शाल्मली' बंगला, स्वत: राबून फुलवला मळा

अखेर प्रशासनाने शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर हे रास्तारोको आंदोलन मागे घेतले. २ आठवड्यांपूर्वीही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी असेच चक्काजाम आंदोलन केले होते. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याच मतदारसंघात असे प्रकार वारंवार होत आहेत. मात्र, प्रशासन मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे खरोखरच दिव्याखाली अंधार असतो का? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

हेही वाचा - अपंगत्वाशी दोन हात, दिव्यांग वैष्णवीची प्रेरणादायी वाटचाल

Last Updated : Feb 25, 2020, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.